घरताज्या घडामोडी'ठाकरे' गटाचे उपनेते बागुल आणि 'शिंदे' गटाचे खासदार गोडसे यांचा एकत्र प्रवास

‘ठाकरे’ गटाचे उपनेते बागुल आणि ‘शिंदे’ गटाचे खासदार गोडसे यांचा एकत्र प्रवास

Subscribe

नाशिक : दोनच दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागतील विकासकामांच्या उद्घाटनाच्या बॅनरवर शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शहरातील डझनभर नगरसेवक आणि काही पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करत असतानाच, ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि खासदार हेमंत गोडसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाल्याने एकच चर्चांना उधाण आले.

जुने शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची  मोठी फौज असलेले सुनील बागुल काही वर्षं राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये राहून दीड वर्षापूर्वीच पुन्हा शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत.त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या आई उपमहापौर पदावर आणि भारतीय जनता पार्टीमध्येच होत्या. तसेच, त्यांचे पुत्र शंभू बागुल हेही त्यानंतर बरेच दिवस भाजपाच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी कायम होते. सेनेत घरवापसी करूनही काही महीने त्यांचे पुनर्वसन न झाल्याने बागुल नाराज असल्याच्याही बातम्या अधूनमधून समोर आल्या होत्या. त्यावेळी पक्षात महत्वाचे मानले गेलेल्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, त्यांच्या आई माजी उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या प्रभाग ६ मध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून झालेल्या विकासकामांच्या उद्घाटना प्रसंगी गोडसे आणि बागुल यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. बागुल यांचे राजकीय वजन बघता नाशिकच्या राजकीय पटलावर या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

वर्षभरापूर्वी हेमंत गोडसे यांच्या खासदार निधि मधून माझी आई नगरसेविका भिकुबाई बागुल यांच्या प्रभाग ६ मध्ये रस्त्याचे काम करण्यात आले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी गोडसे आले असताना, उद्घाटनस्थळी जाण्यासाठी आम्ही एका वाहनातून प्रवास केला बाकी त्याचा काही अर्थ नाही, पक्षबदल असे एका गाडीत फिरल्याने होत नसतात. : सुनील बागुल, उपनेते, शिवसेना (ठाकरे गट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -