Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'मी राजीनामा देतो, पण...' आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिआव्हान

‘मी राजीनामा देतो, पण…’ आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिआव्हान

Subscribe

राज्य सरकारविरोधात जनमत आहे, असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ, ठरवू काय होतं ते , असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं, असून मी राजीनामा देतो, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा, असं प्रति आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना दिलं आहे.

माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आमने सामने उभे ठाकले आहेत. दोघांचीही एकमेकांवर टीका सुरु असते. राज्य सरकारविरोधात जनमत आहे, असं वाटतंय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ, ठरवू काय होतं ते , असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं, असून मी राजीनामा देतो, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्यासमोर उभं करा, असं प्रति आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना दिलं आहे. ( Thackeray Group leader Aditya Thackeray given challenge to Sudhir Mungantiwar )

काय म्हणाले मुनगंटीवार? 

मुंबईत फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांना हे प्रतिआव्हान दिलं. निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत तुम्ही आम्हाला काय सांगता आहात, तुमच्या शिल्लक आमदारांना राजीनामा द्यायला सांगा. पाहिजे तर तुम्ही वरळी विधानसभेत राजीनामा द्या, तिथेच आपण पहिली चाचणी करुन घेऊ. पोपट मेला आहे की जीवंत आहे, याची चाचणी सर्वप्रथम तिथेच करु, असे मुनगंटीवार म्हणाले होते. आता याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंचं प्रतिआव्हान 

- Advertisement -

आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्याविरोधात उभे करणार असाल, तर आताच राजीनामा देतो. चला तयारी आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. तसचं, सरकारमध्ये मुनगंटीवार यांचं कोणीही ऐकत नाही, असा चिमटाही आदित्य ठाकरे यांनी काढला.

( हेही वाचा: महाराष्ट्र आणि बाडेन-वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार – दीपक केसरकर )

865 गावं महाराष्ट्रात आणा

- Advertisement -

इतके आमदार खासदार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमच्या संपर्कात आहेत. आम्ही त्यांना थांबवलं आहे. कारण राजीनामा दिला तर पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागेल, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. कर्नाटक सरकारच्या शपथविधीसाठी गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कर्नाटक सीमाप्रश्न सोडवून परत यावं. महाविकास आघाडीचे नेते फक्त शपथविधीसाटी कर्नाटकात गेले नाही, तर महाराष्ट्रातील 865 गावं कर्नाटकात आहेत. ती गाव परत मागण्यासाठी ते गेले आहेत, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

- Advertisment -