शिंदेंचा पोपट मेलाय फक्त अध्यक्षांनी जाहीर करणं बाकी; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

शिंदे गटाचा पोपट मेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ते सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता फक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर करणं तितकं बाकी आहे. असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Thackeray group leader Sanjay Raut criticised DCM Devendra Fadnavis over Supreme court result on Maharashtra Crisis
शिंदे गटाचा पोपट मेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ते सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता फक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर करणं तितकं बाकी आहे.

शिंदे गटाचा पोपट मेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ते सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता फक्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर करणं तितकं बाकी आहे. असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.  ( Thackeray group leader Sanjay Raut criticised DCM Devendra Fadnavis over Supreme court result on Maharashtra Crisis )

या सरकारच्या घटनात्मक वैधतेचा निर्णय होण गरजेचं आहे. तसचं, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरणं गरजेचं आहे. आमच्या दृष्टीकोनातून हे बेकायदेशीर सरकार आहे. या वक्तव्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. देशात यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आमचा लढा हा याच हुकूमशाहीविरोधात आहे, असं राऊत यावेळी म्हणाले. मी हे सरकार बेकायदेशीर असल्याचं जे वक्तव्य केलं आहे ते माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यावर सरकार गदा आणू पाहत आहे, असं राऊतांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

संजय राऊत आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सरकारवर आरोप केला आहे की हे सरकार माझ्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या पत्रकार परिषदेबाबत आता पत्रकारांवर दबाव आणत आहे. त्यांच्यावर काही ठराविक प्रश्न विचारण्याचा दबाव आणला जात आहे, असं म्हणत सरकारवर आरोप केला आहे.

( हेही वाचा: पोपट मेलाय, मविआला चांगलंच…; आमदारांच्या अपात्रतेबाबत देवेंद्र फडणवीसांचा टोला )

फडणवीसांवर हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेलं आहे.  पोपट मेलेला आहे फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते घोषित करायचं आहे शिंदे गटाचा पोपट मेला असल्याचं राऊतांनी सांगितलं.  अख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस असा माझा समज होता परंतु तेच असं जर बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. त्यांना कायदा, प्रशासन, सरकार कळते ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत तरीदेखील ते अशी वक्तव्य करत आहेत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी दिसत आहे, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.