महिला आरक्षण विधेयक सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, 19 सप्टेंबरला नव्या संसद भवनात 33 टक्के महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक मांडण्यात आलं. त्यावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सोबतच बाळासाहेबांची या आरक्षणासंदर्भात काय भूमिका होती, तीदेखील स्पष्ट केली आहे. (Thackeray group leader Sanjay Raut criticized Modi government over Women reservation bill and told Balasaheb Thackeray s opinion about this bill )
महिलांवर अत्याचार सुरू आहेत. त्यांच्याबाबतीतली गुन्हेगारी वृत्ती अद्याप कायम आहे. अनेक क्षेत्रांत अजूनही महिलांना डावललं जातं, फक्त राजकीय आरक्षण वाढवून महिलांचं सबलीकरण होईल का? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना केंद्र सरकारवर टीका केली.
(हेही वाचा: 3847 कोटींचे कर्ज बुडवल्याच्या आरोपाखाली अवर्सेकांवर गुन्हा; उद्धव ठाकरेंसोबतचे कनेक्शन चर्चेत )
बाळासाहेबांची भूमिका तर…
महिला आरक्षण विधेयकातून खरोखर किती महिलांना न्याय मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण आहे. परंतु तरीदेखील तिथे घराणेशाही चालते. जे पुरूष उमेदवार उभे राहू शकत नाहीत, ते आपल्या पत्नीला, आईला उभं करतात. त्यामुळे ज्या कार्यकर्त्या आहेत त्या मात्र बाजूला पडतात, अशी खंत राऊतांनी यावेळी व्यक्त केली. तसंच, सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचं त्यांनी मान्य केलं.
राऊतांनी यावेळी बाळासाहेबांची याबाबत काय भूमिका होती हे सांगितलं आहे. महिलांना थेट 33 टक्के आरक्षण देण्याऐवजी पक्षांवर बंधनं घाला. प्रत्येक पक्षाला 33 टक्के महिला निवडून आणण्याची अट घाला. म्हणजे महिलांना संधी मिळेल, अशी बाळासाहेबांची भूमिका राऊतांनी सांगितली.
महिलांच्या सन्मामाबाबत त्यांच्या हक्कांबाबत सरकार इतकं विचार करत आहे तर मग संसदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते का केले नाही, असा सवालही त्यांनी केला.
प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात ते माहिती नाही
काल, नव्या संसद भवनात झालेल्या प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीची आणि फोटोची खूप चर्चा आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, याबाबत त्यांचा पक्षच सांगू शकेल. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात ते माहिती नाही परंतु शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत.