Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'सरकार बदलल्यावर...', राऊतांचा शिंदे-फडणवीसांना धमकीवजा इशारा

‘सरकार बदलल्यावर…’, राऊतांचा शिंदे-फडणवीसांना धमकीवजा इशारा

Subscribe

राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सरकार विरोधात बोलायचं नाही. जो बोलणार त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. तसचं, माझ्या नाशिक दौऱ्याबाबतही प्रचंड दबाव आणला जात आहे, याच हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात लढायचं आहे. सरकार बदललं की हे अडचणीत येणार, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सरकार विरोधात बोलायचं नाही. जो बोलणार त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. तसचं, माझ्या नाशिक दौऱ्याबाबतही प्रचंड दबाव आणला जात आहे, याच हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात लढायचं आहे. सरकार बदललं की हे अडचणीत येणार, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे. ( Thackeray group leader Sanjay Raut threatened to Eknath Shinde and Devendra Fadnavis )

कायद्याची पदवी पेटीत बंद करावी

संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की अनेक पक्षांतर केलेले अध्यक्ष आहेत ते. पक्ष वारंवार बदलणं हा त्यांचा आवडता छंद आहे. नार्वेकर हे आधी शिवसेनेचेच वकिल होते. त्यांनी जरा अध्यक्ष म्हणून बोलावं. नार्वेकर हे कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. परंतु त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभं राहायचं असले तर त्यांनी कायद्याची पदवी पेटीत बंद करावी, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

तसचं, न्यायाला विलंब करणं हे घटनाविरोधी आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लवकरात लवकर निर्णय द्यावा लागेल, असं राऊतांनी स्पष्ट केलं

संजय राऊत आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सरकारवर आरोप केला आहे की हे सरकार माझ्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या पत्रकार परिषदेबाबत आता पत्रकारांवर दबाव आणत आहे. त्यांच्यावर काही ठराविक प्रश्न विचारण्याचा दबाव आणला जात आहे, असं म्हणत सरकारवर आरोप केला आहे.

फडणवीसांवर हल्लाबोल

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेलं आहे.  पोपट मेलेला आहे फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते घोषित करायचं आहे शिंदे गटाचा पोपट मेला असल्याचं राऊतांनी सांगितलं.  अख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस असा माझा समज होता परंतु तेच असं जर बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. त्यांना कायदा, प्रशासन, सरकार कळते ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत तरीदेखील ते अशी वक्तव्य करत आहेत म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी दिसत आहे, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

 

- Advertisment -