घरताज्या घडामोडी'अमित शाहांना जमीन म्हणजे काय...' उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

‘अमित शाहांना जमीन म्हणजे काय…’ उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Subscribe

“अमित शाह यांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले. (Thackeray Group Leader Uddhav Thackeray Slams Union Minister Amit Shah)

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकूलन (बीकेसी) येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत उपस्थित जनतेल संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकींचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, केंद्रीय अमित शाह यांच्यावरही निशाणा साधाल.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“नुसती वज्रमुठ करून उपयोग नाही. या वज्रमुठीत आपल्याला भगवा धरायचा आहे. या भगव्याला डाग आणि कलंग लावण्याचा यांनी प्रयत्न यांनी केला आहे. तो त्यांच्याबरोबरच साफ करून हा छत्रपती शिवरायांचा भगवा उंच तेजाने फडकवत ठेवायचा आहे”,

- Advertisement -

“ही तर आता सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचे वस्त्रहरण थांबवण्यासाठी आता एकच वज्रमुठ आणि त्या मुठीत एकच ठोसा असा मारा की, महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या किंवा मग लोकसभेबरोबर तिन्ही निवडणुका घ्या तुम्हाला आम्ही भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”,

“अमित शाह यांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते तो माझा महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -