Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रअजित पवार-अमित शहा भेटीवर ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा, म्हणाले...

अजित पवार-अमित शहा भेटीवर ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा, म्हणाले…

Subscribe

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अजित पवार यांची भेट अचानक घेण्यात आली नसून ती पूर्वनियोजित भेट होती, अशी माहिती भाजप कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, या भेटीवरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

मुंबई : अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्यांना बरे वाटताच त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी काटेवाडी येथे शरद पवारांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबिय प्रतापराव पवार यांच्या घरी जमले होते. या भेटीनंतर अजित पवार यांनी थेट दिल्लीकडे झेप घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीवेळी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे देखील उपस्थित होते. या भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंतु, ही भेट अचानक घेण्यात आली नसून ती पूर्वनियोजित भेट होती, अशी माहिती भाजप कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, या भेटीवरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. (Thackeray group leader’s big claim on Ajit Pawar-Amit Shah meeting)

हेही वाचा – धनगर समाजाकडून पुन्हा आमरण उपोषणाचा निर्णय, सरकारविरोधात यशवंत सेना संतापली

- Advertisement -

या भेटीबाबत बोलताना विनायक राऊत म्हणाले की, अजित पवार यांना पश्चताप होत आहे. त्या पश्चातापातून कसे मुक्त व्हायचे याकरिता ते विचार करत आहेत. अजित दादा स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्याचे काम ठाकरेंनी केले होते. परंतु, आता त्यांची गळचेपी होत असल्याचे प्रत्येक विधानातून दिसून येत आहे. तसेच, मागच्या आठवड्यातही दिल्लीला जाऊन अजित पवारांनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिंदेंचे विसर्जन झाल्यावर (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ संपल्यावर) आपल्याला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली असावी असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.

अजित पवार यांनी तब्येत बरी नसतानाही अमित शहा यांची थेट दिल्लीला जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहेत. या भेटीवरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा टिका केली होती. आपल्याला माहीत आहे की आजारी असलेल्या माणसाला सर्वजण भेटायला येत असतात. त्यांची विचारपूस करत असतात. हवा खराब आहे. डेंग्यू झाला आहे. प्लेटलेट्स कमी आहेत, अशी विचारपूस करून आपण काळजी घेत असतो. जो माणूस आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला दिवाळीत भेटू नका, मी आजारी आहे. तो आजारी माणूस उठतो आणि दिल्लीत कोणाला तरी भेटायला जातो. आजारी माणसाने दुसऱ्यांना भेटायला जायचे, आजारी माणसाला कोणी भेटायला यायचे नाही, ही एक नवीन परंपरा सरकारमध्ये सुरू झाली आहे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊतांकडून करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -