Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कार्यालय नियमित न करण्यासाठी किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला; अनिल परबांचा आरोप

कार्यालय नियमित न करण्यासाठी किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला; अनिल परबांचा आरोप

Subscribe

'किरीट सोमय्या यांनी हे कार्यलय नियमीत न करण्यासाठी म्हाडावर सतत दबाव टाकला. त्यामुळे म्हाडाने आम्हाला पत्र लिहिले आणि सांगितले की हे कार्यलय नियमीत करता येणार नाही', असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला.

‘किरीट सोमय्या यांनी हे कार्यलय नियमित न करण्यासाठी म्हाडावर सतत दबाव टाकला. त्यामुळे म्हाडाने आम्हाला पत्र लिहिले आणि सांगितले की हे कार्यलय नियमित करता येणार नाही’, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी स्पष्ट केले. (Thackeray Group MLA Anil Parab Slams BJP Leader Kirit Somaiya)

“1960 सालापासून म्हाडाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या आपण ज्या इमारतीच्या परिसरात बसलेले आहात, त्याच इमारतीचा मी रहिवाशी असून, माझा जन्म या इमारतीत झाला. मी आज आमदार किंवा माजी मंत्री म्हणून बोलत नाही, तर म्हाडाचा आणि या इमारतीमधील रहिवाशी म्हणून बोलत आहे. या इमारतीत माझे लहानपण गेले, इथेच मी मोठा झालो. ज्यावेळी मी आमदार झालो, त्यावेळी या इमारती स्वत:च्या मालकीच्या असून, म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाहीत. त्यावेळी इमारतीमधील रहिवाशांनी मला सांगितले की, आपण आमदार झाला तर, आपले जनसंपर्क कार्यालय आपल्या इमारतीमध्येच राहुद्या. त्यामुळे सोसायटीची जागा तुम्ही वापर ती वापरण्यास आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी आमच्या या सोसायटीची जागा वापरत होतो. परंतु, या जागेवर काही लोकांनी तक्रारी केल्या”, असे अनिल परब म्हणाले.

- Advertisement -

“मी मंत्री झाल्यानंतर भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी म्हाडा, लोकायुक्त यांसह सगळ्यांकडे माझी तक्रार दाखल केली आणि माझे कार्यालय हे अनधिकृत असल्याचे भासवत ते तोडण्यास सांगितले. त्यानंतर म्हाडाने मला नोटीस जारी केली. त्यावेळी मी या म्हाडाच्या नोटीसला मी उत्तर दिलं की ही जागा माझी नसून मी या जागेचा मालक नाही. माझा या जागेचा संबंध नसून ही सोसायटीची जागा आहे. त्यानंतर म्हाडाने मला पत्र लिहून नोटीस मागे घेतली. त्यानंतर या इमारतीमधील रहिवाशी उच्च न्यायालयात गेले. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की, तुम्ही हे कार्यालय नियमीत करण्यासाठी अर्ज करा. त्यानुसार इमारतीने कार्यालय नियमीत करण्यासाठी अर्ज दाखल केला, त्यानंतर आम्ही म्हाडाला त्या अर्जावर निर्णय घेण्यास सांगितले”, असे अनिल परब यांनी सांगितले.

“काही दिवसांपूर्वी म्हाडाने सांगितले की हे कार्यालय नियमित करता येणार नाही. किरीट सोमय्या यांनी हे कार्यलय नियमित न करण्यासाठी म्हाडावर सतत दबाव टाकला. त्यामुळे म्हाडाने आम्हाला पत्र लिहिले आणि सांगितले की हे कार्यलय नियमीत करता येणार नाही. त्यामुळे आमच्या सोसायटीने मिटींग घेऊन हे कार्यलय काढण्याचे ठरवले. त्यानुसार या जागा मोकळ्या करण्यात आल्या”, असेही अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

“म्हाडाच्या रहिवाशांसोबत चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवणार. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कार्यालयाची पाहणी करण्यासाठी सौमय्यांनी यावं आम्ही त्यांचे स्वागत करतो. आता मी रस्त्यावर उभा आहे. मी एक शिवसैनिक आहे. असे आव्हान परब यांनी सौमय्यांना दिलं आहे. आम्ही पक्ष बदलण्यासाठी हा दबाव टाकला जातोय. आधी मंत्री असताना बंधनं होती”, असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – माझ्या धमक्यांमुळे सोडून गेले की, खोक्यांसाठी? शिंदे गटाने भूमिका स्पष्ट करण्याची राऊतांची मागणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -