मुंबई : ओबीसी नेतृत्वावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या भास्कर जाधवांची नीच वृत्ती आहे, अशा शब्दात भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. राज्यात शिवसेना फुटीनंतर राजकीय नेत्यांकडून एकमेंकांवर खालच्या पातळीत टीका करणे ही सामान्य बाब झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरल्याचे स्पष्ट दिसून येते. यात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली होती. भास्कर जाधवा यांच्या टीकेला राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले.
राम सातपुते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सर्व लोकांचे मानसिक संतुलन बिघडले असून भास्कर जाधवांनी बावनकुळेंच्या रंगावर केलेली टीका केली होती. ही एका ओबीसी नेतृत्वावर खालच्या पातळीची टीका भास्कर जाधवांची नीच वृत्ती आहे.” राम सातपुते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांना ओबीसी समाजाचा द्वेष करतात. हे या कृतीतून दिसून आले. एका सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्ती हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्या जळफळाट होतोय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासरख्या चांगल्या नेतृत्वावर रंगावरून टीका करणे हाच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा केविलवाला प्रयत्न आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातील ओबीसी समाजाला उत्तर द्यावे लागेल.”
हेही वाचा – पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या भोंदूसारखी तुमची अवस्था…, भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका
नेमके काय आहे प्रकरण
(शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत म्हणाले, उद्धव ठाकरेंना आता जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावे लागेल. बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर भास्कर जाधवांनी प्रत्युत्तर दिले. भास्कर जाधव बावनकुळेंवर टीका करताना म्हणाले, “वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार?, खेळाडूने तोंडावर लगाम लावावा”, असे प्रत्युत्तर दिले होते.