घरताज्या घडामोडीदेशात सत्यमेव जयतेला महत्त्व, सत्तामेव जयतेला नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

देशात सत्यमेव जयतेला महत्त्व, सत्तामेव जयतेला नाही; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

Subscribe

'आपल्या देशात अजूनही सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला महत्त्व नाही. कितीही सत्ता असुद्या सत्तेला नेहमीच सत्य समोर झुकावे लागते', अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

‘आपल्या देशात अजूनही सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला महत्त्व नाही. कितीही सत्ता असुद्या सत्तेला नेहमीच सत्य समोर झुकावे लागते’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. (thackeray group mp aaditya thackeray slams eknath shinde and devendra fadnavis)

आदित्य ठाकरेंची आज बिडकीन येथे सभा झाली. या सभेत त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यावेली ते म्हणाले की, “या देशाच अजूनही आपण संविधाना, कायद्याला मानतो. सर्वोच्च न्यायालयात आपली लढाई सुरू आहे. संविधानाप्रमाणे निर्णय झाला तर, आज हे 40 गद्दार अपात्र ठरतील. पुन्हा ते कधीच निवडणूक लढवू शकणार नाहीत. मला विश्वास आहे, असेच होईल. कारण आपल्या देशात अजूनही सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला महत्त्व नाही. कितीही सत्ता असुद्या सत्तेला नेहमीच सत्य समोर झुकावे लागते”

- Advertisement -

“खरंतर महाराष्ट्राला तुम्ही पुढे न्याल ही अपेक्षा होती. परंतु, तुम्ही सगळ्याचा अपमान केला. पण आज महाराष्ट्रात जे काही चित्र दिसतंय. चारी बाजूला अंधार पसरलेला दिसतोय. हे चित्र बरं दिसत नाही. महाराष्ट्रात दोन महत्त्वाची क्षेत्र असून, ते महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात. महाराष्ट्राचेही डबल इंजिन आहे. पहिले उद्योग आणि दुसरे कृषी आहे. आज इथे पसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही तुमच्या बांधावर येत होतो. तुमच्या दुख:त सहभागी होत होतो. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आम्ही जाऊन भेट देत होतो. पण तुम्ही आताच्या सरकारमधील कृषीमंत्र्यांना पाहिले आहे का?”, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.

“आपण महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण कोणाच्या तरी पोटात दुखू लागले आणि त्याने या 40 आमदारांना गद्दारी करायला लावली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजिर खुपसायला लावले आणि आपले सरकार पाडले. आपल्याला त्यांनी विरोधी पक्षात बसवलं. अगोदरही आपण विरोधी पक्षातच बसत होतो”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विचारांचे म्हणजे भाजपाचे आणि गद्दारांचे सरकार आले आहे. ते संविधानाचा मान राखतील, लोकशाहीचा मान राखतील, राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकाच्या रिंगणात उतरतील असे वाटत होत. पण असे झाले का नाही? अजूनही आमदारकीची निवडणूक लागलेली नाही. हे सरकार घटनाबाह्य आहे. आपल्याला आणखी काही महिने या सरकारला सहन करावे लागणार आहे. पण नंतर हे 40 आमदार बाद होणार म्हणजे होणारच”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.


हेही वाचा – आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -