2024 ला सरकार बदलणार आणि सगळ्याचा हिशेब पूर्ण होणार; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

कोणतही सरकार कायम असत नाही. 2024ला सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल, अशा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट मिळाली आहे.

कोणतही सरकार कायम असत नाही. 2024ला सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल, अशा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट मिळाली आहे. यावर बोलताना राऊतांनी इशारा दिली. शिवाय, याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचेही संजय राऊतांनी सांगितले. (Thackeray Group MP Sanjay Raut Criticism On Kirit Somaiya For INS Vikrant Scam Case)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सकाळी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांवर भाष्य केले. “सरकार बदलल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे सोमय्यांना मिळालेली क्लिनचिट आहे. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैसे गोळा झाले आहेत. पैशांचा अपहार झालाच आहे. पैसे राजभवनमध्ये गेले म्हणतात. पण राजभवन सांगते पैसे आलेच नाही. मग हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

“क्लिनचिट कशी मिळते हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे. आमच्या लोकांना मात्र, क्लिनचिट मिळत नसल्याचे राऊत म्हणाले. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित विषय आहे”, असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा माजी नगरसेवक मुलगा नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिली आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत युद्धनौकेसाठी जमवलेल्या कोंटीवधींच्या निधीचा अपहार प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे. या अहवालाबाबत कोर्टात लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय?

भारतीय नौदलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करुन संग्रहालय रुपात जतन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्यांसह त्यांचा पुत्र नील सोमय्याने पुढाकार घेऊन मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी उभारण्याचा घाट घालत सुमारे 57 कोटींचा निधी जमा केला होता. याच निधीत अपहार केल्याचा आरोप कर माजी सैनिकानं तक्रार नोंदवली होती.


हेही वाचा – मविआच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, संजय राऊतांचा इशारा