…तर २०२४च्या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन होईल; संजय राऊतांचा भाजपाविरोधात प्लॅन

फक्त विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. विरोधकांनी आपापसातले वादविवाद दूर ठेवावे. सध्याचे निकाल पाहता विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास पुढील २०२४च्या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

shiv sena leader sanjay raut attack pm narendra modi mumbai visit and adani issue in parliament

फक्त विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. विरोधकांनी आपापसातले वादविवाद दूर ठेवावे. सध्याचे निकाल पाहता विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास पुढील २०२४च्या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवाय, विरोधक एकत्र आल्यास गुजरातमध्येही परिवर्तन होईल, असेही त्यांनी सांगितले. (Thackeray Group MP Sanjay Raut Said Bjp Will Lose Ground In The Lok Sabha Elections In 2024)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत देशात परिवर्तन घडवण्यासाठीचा प्लॅन सांगितला. “हिमाचल प्रदेश लहान राज्य आहे. पण ज्या हिमाचलमध्ये काँग्रेस लढते त्यासाठी त्यांचेही अभिनंदन. त्यामुळे अजूनही लोकांना वाटतेय की हिमाचलमध्ये कॉंग्रेसची सत्ता येईल. देशातील पुढील निवडणुकांसाठी हे आशादायी चित्र आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. विरोधकांनी आपापसातले वादविवाद दूर ठेवावे. सध्याचे निकाल पाहता विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास पुढील २०२४च्या निवडणुकांमध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. गुजरातमध्येही परिवर्तन होईल”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याशिवाय, “देशभरात तीन महत्वाच्या निवडणूका झाल्या. काल दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाली. या दिल्ली महापालिका निवडणुकीत १५ वर्षांपासून असलेली भाजपा सत्ता आपने खेचून घेतली. बसपा एमआयएम यांची मतविभागणी झाली नसती. तर आपला चांगला प्रकारे निकाल घेता आला असता. पण तरीही जे निकाल दिल्लीत आपला मिळाले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. कारण १५ वर्षांची सत्ता भाजपाकडून खेचून घेणे सोपे काम नाही. दुसरा गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे अशी लोकांना शंका आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा..’ भाजपा-आपमध्ये साटेलोटे, संजय राऊतांचा थेट आरोप