आमच्या आराध्य दैवतांचा ‘भाजपाच्या आराध्य दैवतां’कडून अपमान; संजय राऊतांचा हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. आमच्या आराध्य दैवतांचा भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवतांकडून अपमान होतोय, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. आमच्या आराध्य दैवतांचा भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवतांकडून अपमान होतोय, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, ‘काल छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. राज्यपालांचे जिथे कार्यक्रम होणार असतील ते आम्ही उधळून लावू ही त्यांची लोकभावना आहे’, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले. (Thackeray Group MP Sanjay raut Slams bjp leaders and cm eknath shinde)

खासदार संजय राऊत यांनी माध्यामांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी राऊत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान केला जात आहे. आमच्या आराध्य दैवतांचा भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवतांकडून अपमान होतोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते हे अपमान करत आहेत. ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्या पद्धतीने आम्ही हा विषय बाजूला करू असे त्यांना वाटत असेल”

पुढे संजय राऊत म्हणाले की, “कर्नाटकाकडून महाराष्ट्राचा होणार अपमान. आता विरोधीपक्ष एकत्र आलेला आहे. विरोधी पक्षाचा अॅक्शन प्लॅन रेडी आहे. पण सध्या आम्ही वाट पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ त्यांचे आमदार, जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून गेले. हे अजून हात चोळत बसले आहेत”

“आम्ही जनतेला दाखवत आहोत की, बघा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन सुद्धा हे सरकार आणि त्यांचे आमदार त्यांच्या विरोधात बोलत नाही आहेत. याच लोकांनी शिवसेना फोडली, कारण महाराष्ट्राला शिवसेनेचा अभिमान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी पावलं उचलायला हवीत ती उचलत आहोत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.

“काल छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. राज्यपालांचे जिथे कार्यक्रम होणार असतील ते आम्ही उधळून लावू ही त्यांची लोकभावना आहे. पण अजूनही महाराष्ट्राने सय्यम राखला आहे. राज्यपालांचा बचाव केला जातोय. सूदांशी त्रिवेदीचा बचाव केला जातोय. एकेकाळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राची माफी मागितली होती. पण हे भाजपाचे टगे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवत आहेत”, असेही राऊत म्हणाले.

“महाराष्ट्र आता संतापलेला आहे. आतून खवळलेला आहे आणि आता याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आता वेट अॅण्ड वॉच”


हेही वाचा – पाणी जपून वापरा! मुंबईत 29-30 नोव्हेंबर रोजी पाणीकपात