घरताज्या घडामोडीपवन खेरांच्या अटकेनंतर राऊतांची भाजपावर टीका; म्हणाले, 'हा नियम फक्त विरोधकांसाठीच...'

पवन खेरांच्या अटकेनंतर राऊतांची भाजपावर टीका; म्हणाले, ‘हा नियम फक्त विरोधकांसाठीच…’

Subscribe

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केली. यानंतर भाजपाकडून पवन खेडा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज खेडा यांना दिल्ली विमानतळावर आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केली. यानंतर भाजपाकडून पवन खेडा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज खेडा यांना दिल्ली विमानतळावर आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ‘पंतप्रधान या पदाचा आम्ही नेहमीच आदर ठेवतो. पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य करणे शक्यतो टाळली पाहिजेत. पण हा नियम फक्त विरोधकांसाठीच आहे का? कारण भाजपाचे नेतेमंडळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांसह अनेक नेत्यांवर अपशब्दांचा वापर करून टीका करतात’, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Bjp On Congress Leader Pawan Khera Arrest)

“पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याची मला अधिक माहिती नाही. मात्र आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर येऊन पवन खेरा यांना अटक करणे हे काय दर्शवते. मला वाटते चुकून पवन खेरा यांच्याकडून ते वक्तव्य आले असले. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी देखील मागितल्याचे मला समजले. परंतु, पण त्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली. या माध्यमातून तुम्ही आपल्या पोलिसांची ताकद दर्शवता आहात का? आपण यालाच तर कायदा आणि यंत्रणांचा दुरूपयोग म्हणतो”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

“प्रत्येकाला बोलण्याचे एक स्वातंत्र्य असते. अनेक पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी असतात, त्यांच्याकडूनही कधी-कधी चूका होतात. त्यामुळे मला वाटते की, पवन खेरा यांच्याकडून चुकून ते वक्यव्य आले असावे. पण आसाम पोलीस पवन खेरा यांना अटक करण्याची वाट बघत होते का? कारण ते कधी विमानतळावर जाताहेत आणि आम्ही त्यांना अटक करतो. ज्यामुळे एक नवीन बातमी तयार होईल. पण या नव्या बातमीच्या नादात पवन खेरा यांना अटक करण्यात आली”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

काँग्रेस नेते पवन खेडा यांना आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पवन खेरा दिल्लीहून रायपूरला निघाले होते. त्यावेळी त्यांना विमानात चढण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहावर गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच, पवन खेरा यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीप्पणी केली होती. ‘वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती, मग नरेंद्र दामोदर दास मोदी यांना समिती स्थापन करण्यात काय अडचण आहे?’, असा सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला होता. पवन खेरा यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून खेरा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंत आज खेरा यांना दिल्ली विमानतळावर प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.


हेही वाचा – विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर… सर्वोच्च न्यायालयाने ठेवले नेमकेपणाने बोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -