केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचे बजेट; संजय राऊतांची टीका

गुरूवारी सकाळी पत्रकरांशी बातचीत करताना संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. "अमृत काळ हा भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकींसाठी असेल. काल सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचे बजेट आहे. जनतेच्या आणि सरकारी पैशाने 2024च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील, याचे उत्तर उदाहरण म्हणजे कालचे बजेट आहे.

Sanjay Raut made a big statement about national politics and Uddhav Thackeray

‘काल सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचे बजेट आहे. जनतेच्या आणि सरकारी पैशाने 2024च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील, याचे उत्तर उदाहरण म्हणजे कालचे बजेट आहे’, अशा शब्दांच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लोबोल केला. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams BJP On Union Budget 2023-24)

गुरूवारी सकाळी पत्रकरांशी बातचीत करताना संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. “अमृत काळ हा भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकींसाठी असेल. काल सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीचे बजेट आहे. जनतेच्या आणि सरकारी पैशाने 2024च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील, याचे उत्तर उदाहरण म्हणजे कालचे बजेट आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल देशाला मिळते, त्याच महसूलातून कालचे बजेट सादर करण्यात आले. परंतु, मुंबई आणि महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काय मिळाले, तर माझ्या माहितीनुसार, मुंबईच्या हातावर चमचा भर हलवाही मिळालेला नाही”, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

“गेल्या काही वर्षांपासून मुंबईचे आणि महाराष्ट्राचे अशाप्रकारे औद्योगिक आर्थिकदृष्या अदपतन करण्याचे कारस्थान कालच्या बजेटमध्ये पुन्हा दिसले. मुंबईत पंतप्रधान वारंवार येत आहेत, केंद्रीय मंत्रीही मोठ्या संख्येने येत आहेत. उपमुख्यमंत्रीही मोठ्या-मोठ्या घोषणा करत आहेत. पण या सर्व घोषणा आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केल्या जात आहेत”, असेही राऊत म्हणाले.

“पंतप्रधान एकाच महिन्यात दोनदा मुंबईत येत आहेत. पण येत असताना मुंबईसाठी काय आणताहेत आणि काय देताहेत? हा एक रहस्यमय असा विषय आहे. मुंबई महापालिका जिंकून शिवसेनेची सत्ता घालवून आणि भविष्यात ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून आणि महाराष्ट्राचे तुकडे करून जर कोणाला समाधान मिळणार असेल, तर ते शक्य नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

“या बजेटमध्ये मुंबईच्या अनेक मागण्या होत्या. अनेक खासदारांनी केलेल्या मागण्या होत्या. पण आम्ही सातत्याने आवाज उठवूत राहू. देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपाने केलेले आहे. त्यामुळे शेअर बाजारावर देशाचे अर्थव्यवस्था ठरवण्याचे जे काम सुरू आहे, त्याचा सर्वसामान्यांशी काहीच संबंध नाही. पण सामान्य जनतेचे पैसे अत्यंत विश्वासाने भारतीय आयुर्विमा, LIC आणि स्टेट बँकेत जे नोकरदारांचे पैसे आहेत. त्याचा सरकारला हिशोब द्यावा लागेल”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; संपू्र्ण जानेवारी महिना ठरला प्रदूषित