घरताज्या घडामोडीएकमेव पंतप्रधान पाहिले जे 9 महिने 'काम की बात' करत नाही; संजय...

एकमेव पंतप्रधान पाहिले जे 9 महिने ‘काम की बात’ करत नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बातचा काल 100वा भाग होता. हा 100 वा भाग पाहण्यासाठी देशभरातील जनतेने टीव्हीसमोर गर्दी केली होती. राजभवनावरही मन की बात कार्यक्रमाची स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी अनेक बॉलिवूड स्टार उपस्थित होते. या सुपरहिट शोचे अनेक बॉलिवूड स्टार्सने कौतुकही केले. मात्र या ‘मन की बात’वर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. “एकमेव पंतप्रधान पाहिले जे नऊ महिने ‘काम की बात’ करत नाही, नुसती ‘मन की बात’ करतात”, अशा शब्दांत हल्लाबोल केला. (Thackeray group MP Sanjay Raut Slams CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis)

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. या सभेत भाष्य करता संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

“आज महाराष्ट्र दिवस आहे. महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी वज्रमूठ सभा आहे. जेवढी सभा भरली आहे, तेवढीच दुप्पट लोक या मैदानाच्या बाहेर आहेत. सगळ्यात लहान मैदानावर सभा होते अस बोलत होते. त्यांना सांगू इच्छितो तुमचे डोळे चिनी आहेत. मुंबई आमच्या बापाची आहे. काल मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. आता आहेत का माहीत नाही बहुतेक सभेत आले असतील बसले असतील. पाहा ही ताकद आम्ही सगळे एक आहोत आणि एकत्र आहोत”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“अजितदादा बसले आहेत सध्या दादा तुम्हाला सगळ्यांना तुमचे आकर्षण आहेत. आम्ही बोलतो दादा येणार, दादा बोलणार, दादा जिंकणार. आदित्य ठाकरे आले आणि जिंकून गेले”, असे संजय राऊत म्हणाले.

“काल आणखी एक कार्यक्रम झाला. काय तर ॲक्टर ऐकत आहेत. एकमेव पंतप्रधान पाहिले जे नऊ महिने ‘काम की बात’ करत नाही आहे नुसती ‘मन की बात’ करतात. महाराष्ट्रची वज्रमूठ सभा काम की बात करेल”, असे संजय राऊत म्हणाले.

“राज्याचे लचके तोडण्याचे काम दिल्लीतून सुरू आहे. मुंबई रज्यापासून लचके तोडायचे यासाठी शिवसेनेवर घाव घातला. तुम्ही कितीही लचके तोड केली तरी शिवसेना महाराष्ट्रात पाय रोवून राहणार. विरोधात बोले की आत टाका अस आव्हाड म्हणाले. या व्यासपीठावर भुजबळ देशमुख आणि मी आहे. आम्ही आत गेलो काही घाबरलो नाही. या मंचावर तीन नेते आहेत, अनिल देशमुख, छगन भुजबल आणि मी आहे. आम्ही तिघेही आत जाऊन आलो. आम्ही तुम्हाला घाबरत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

“बोगस देशभक्तांची फौज घेऊन ते आमच्याशी लढायला आले आहेत. पण आमच्याशी त्यांना लढता येणार नाही. कारण इथे वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ दिल्लीत कायम राहिल, मुंबईत कायम राहिल आणि विधानसभेतही कायम राहील”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -