घरताज्या घडामोडीतुम्ही शत्रूच्या संदर्भात अशा भावना व्यक्त करू नयेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना...

तुम्ही शत्रूच्या संदर्भात अशा भावना व्यक्त करू नयेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. "राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी'', असा सल्ला राज ठाकरेंनी दिली होता.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असा सल्ला राज ठाकरेंनी दिली होता. त्यावर तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams MNS Chief Raj Thackeray)

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेटी घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. “मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना संजय राऊतांवर ईडीच्या कारवाई विषयी प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना त्यांनी राऊतांना खोचक सल्ला दिला होता. “संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी” असे ते म्हणाले होते.


हेही वाचा – चांगले निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -