घरताज्या घडामोडीनारायण राणे, किरीट सोमय्या हे भाजपाचे पोपटलाल; संजय राऊतांचा हल्लाबोल

नारायण राणे, किरीट सोमय्या हे भाजपाचे पोपटलाल; संजय राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणे यांनी केला होता. परिणामी आपली बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

‘नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांना मी भाजपाचे पोपटलाल समजतो. मागचा पुढचा विचार न करता ते फक्त पोपटासारखे बोलत राहतात. त्यामुळे या दोघांविरोधात मी कायदेशीर नोटीस पाठवून न्यायालयात उत्तर द्यायला लावू’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Union Minister Narayan Rane)

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले असा दावा राणे यांनी केला होता. परिणामी आपली बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकरांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा व नारायण राणे यांच्यावर हल्लबोल केला.

- Advertisement -

“नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांना मी भाजपाचे पोपटलाल समजतो. मागचा पुढचा विचार न करता ते फक्त पोपटासारखे बोलत राहतात. त्यामुळे या दोघांविरोधात मी कायदेशीर नोटीस पाठवून न्यायालयात उत्तर द्यायला लावू. ही लोक भन्नाट आणि बिनबुडाचे आरोप करत असतात. आमच्या सगळ्यांबाबत ते काहीही विधान करत असतात. त्यामुळे आता वेळ आली असून, आता आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचे ठरवले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“नारायण राणे असे सांगतात की, 2004 साली त्यांनी मला खासदार केले, मग त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काय करत होते? नारायण राणे बोलतात जसे, काय ते शिवसेनाप्रमुख होते का? आता फक्त यांनी एवढंच सांगायचं बाकी ठेवलेले आहे की, बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मी नेमणूक केली. यावरून समजते की, हे काहीही विधान करू शकतात”, असेही राऊत म्हणाले.

- Advertisement -

“2004 साली माझी स्वत:ची वैयक्तीक अशी ओळख होती. त्यावेळी सामनाचा संपादक होतो. त्यापूर्वी सामना वृत्तपत्रातचं काम करत होतो. परंतु, त्यांचे असे म्हणणे आहे की, माझे मतदार यादीत नाव नव्हते. पण मी गेली 25 वर्षे मतदान करत होतो. सर्व निवडणुकांमध्ये मी मतदान केलेले आहे. मी काय बांगलादेशी नागरिक आहे? की मी पाकिस्तानी नागरिक आहे? हा एक कॉमन्सेस आहे. मी या देशाचा नागरिक आहे, माझे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झालेले आहे. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. अनेक निवडणुकांमध्ये मी मतदान केलेले आहे. त्यामुळे 2004मध्ये माझे नाव मतदार नोंदणी यादीमध्ये होते. त्यामुळे त्यांनी माझा उमेदवारी अर्ज जाऊन पाहावा माझा मतदार नोंदणी क्रमांक आहे की नाही”, असेही राऊतांनी सांगितले.

“भाजपाच्या नादाला लागून माणसं किती खोटं बोलत आहेत. मात्र आता मी यावर बोलणार नसून, त्यांनी याबाबत माफी मागितली नाही तर, मी याविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार आहे. किरीट सोमय्या यांच्याविरोधातही मी खटला दाखल करणार आहे. केवळ मी एकटाच खटला दाखल करणार नसून शिवसेनेचे बहुतेक लोकांवर आरोप केले गेले आहेत, ते सगळे जण न्यायालयात खटले दाखल करणार आहेत”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

“मी हा खटला पैशांसाठी दाखल करत नाही. यांची चार आण्याचीही लायकी नाही. चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा खटला दाखल केला होता. मला काही पैसे नकोय, मी मध्यमवर्गीय माणूस आहे. मी त्यांनी कोर्टात खेचणार आणि त्यांनी कोर्टातच उत्तर द्यायला लावणार आहे. तुमचे काही पुरावे असतील त्यांनी ते कोर्टात द्या. आम्ही सत्याची बाजू सातत्याने घेतली”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – पुण्यात शिंदे गटातील नेत्याच्या पत्नीची आत्महत्या; कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याची चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -