घरताज्या घडामोडी"मला धमक्या देऊ नका... नादालाही लागू नका... महागात पडेल'', राऊतांचा राणेंवर पलटवार

“मला धमक्या देऊ नका… नादालाही लागू नका… महागात पडेल”, राऊतांचा राणेंवर पलटवार

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात आता नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तरुंगात पाठवण्यासाठी मार्ग मोकळा करतोय असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात आता नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा तरुंगात पाठवण्यासाठी मार्ग मोकळा करतोय असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. “मला धमक्या देऊ नका आणि माझ्या नादाला लागू नका तुम्हाला महागात पडेल. तुमची प्रकरणे काढली तर तुम्ही पन्नास वर्षे जेलच्या बाहेर येणार नाहीत”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Union Minister Narayan Rane)

शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना इशारा दिला. “तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे झाला का? धमक्यांना मी घाबरत नाही, राजवस्र बाहेर काढून या. मला बोलायला लावू नका, झाकली मूठ सव्वा लाखाची, कधीकाळी ते आमचे सहकारी होते, त्यामुळे आम्ही बोललो नाही. मला बोलायला लावू नका. ईडीची नोटिस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. तुमच्या सारखे आम्ही पळून गेलो नाही. पक्षासाठी आम्ही जेलमध्ये गेलो. नारायण राणे यांची सगळी वक्तव्य जस्टीस ऑफ इंडियाला पाठविली आहे. सगळे रेकॉर्ड मी पाठविले आहे. एक दिवस तुम्हाला ते महागात पडेल. तुमची सगळी आर्थिक प्रकरणे बाहेर काढली, तर तुम्हाला पन्नास वर्षे जेलमध्ये राहावे लागेल”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

“मला धमक्या देऊ नका आणि माझ्या नादाला लागू नका तुम्हाला महागात पडेल. तुमची प्रकरणे काढली तर तुम्ही पन्नास वर्षे जेलच्या बाहेर येणार नाहीत”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले नारायण राणे?

- Advertisement -

“मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते. हा माझा वाईट स्वभाव आहे. त्यामुळे संजय राऊतांनी लिहलेला २६ डिसेंबरचा अग्रलेखही माझ्या लक्षात आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. संजय राऊत १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिले. ते त्यांना कमी वाटत असावेत. त्यामुळे राऊतांना पुन्हा तुरुंगात जावेसे वाटत असेल. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.


हेही वाचा – संजय राऊतांचा परत तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय; नारायण राणेंचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -