‘दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा..’ भाजपा-आपमध्ये साटेलोटे, संजय राऊतांचा थेट आरोप

गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे अशी लोकांना शंका आहे, असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे अशी लोकांना शंका आहे, असा थेट आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्ली महापालिकेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निकालानुसार दिल्ली महापालिकेवर आपने आपला झेंडा फडवला. परंतु, सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडीवर असल्याचे दिसत आहे. (Thackeray Group MP Sanjay Raut Talk About Gujarat Election MCD Election Delhi BJP AAP)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि आपमध्ये डील झाल्याचा आरोप केला. “देशभरात तीन महत्वाच्या निवडणूका झाल्या. काल दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक झाली. या दिल्ली महापालिका निवडणुकीत १५ वर्षांपासून असलेली भाजपा सत्ता आपने खेचून घेतली. बसपा एमआयएम यांची मतविभागणी झाली नसती. तर आपला चांगला प्रकारे निकाल घेता आला असता. पण तरीही जे निकाल दिल्लीत आपला मिळाले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. कारण १५ वर्षांची सत्ता भाजपाकडून खेचून घेणे सोपे काम नाही. दुसरा गुजरातचा निकाल बघता तो अपेक्षितच होता. कारण तिकडे आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली असती तर नक्कीच भाजपाला काटे की टक्कर द्यावी लागली असती. पण कदाचीत दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असे काही तरी झाले असावे असा संशय लोकांना येऊ लागला आहे”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याशिवाय, “हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस चांगली लढत देत आहे आणि हे चित्र आशादायी आहे. तीन प्रमुख निवडणुकांपैकी गुजरात भाजपाला मिळाले. दिल्ली हातून गेलंय, हिमाचलमध्ये संघर्ष करावा लागतोय पण तरीही कॉंग्रेस नक्कीच जिंकेल. आज तीन विरुद्ध एक असा सामना झाला आहे. गुजरातमधील भाजपाच्या विजयाबद्दल अभिनंदन. हिमाचल प्रदेश लहान राज्य आहे. पण ज्या हिमाचलमध्ये काँग्रेस लढते त्यासाठी त्यांचेही अभिनंदन. त्यामुळे अजूनही लोकांना वाटतेय की हिमाचलमध्ये कॉंग्रेसची सत्ता येईल. देशातील पुढील निवडणुकांसाठी हे आशादायी चित्र आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – आता महाराष्ट्रालाच उठाव करावा लागेल, सीमाप्रश्नावरून ठाकरे गटाचा इशारा