घरताज्या घडामोडीफडणवीसांवर कुरघोडी करता-करता राऊतच झाले ट्रोल; वाचा नेमकं काय घडलं?

फडणवीसांवर कुरघोडी करता-करता राऊतच झाले ट्रोल; वाचा नेमकं काय घडलं?

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या विधानांमुळे संजय राऊत सातत्याने विरोधकांच्या रडारवर असतात. मात्र, सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे संजय राऊत नेटकऱ्यांच्या हीट लिस्टवर आले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या विधानांमुळे संजय राऊत सातत्याने विरोधकांच्या रडारवर असतात. मात्र, सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे संजय राऊत नेटकऱ्यांच्या हीट लिस्टवर आले आहेत. त्याचे कारण म्हणजे संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना केलेले वक्तव्य. (Thackeray Group MP Sanjay Raut Troll On Social Media Due To Said 36 States In India)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

- Advertisement -

खासदार संजय राऊत आज सकाळी राज्यातील घडामोडी आणि राजकारणावर माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना त्यांचे एक वक्तव्य चुकलं. “या देशात ३६ राज्य आहेत. ३६ मधल्या १६ चा आकडा काय घेऊन सांगताय? किती नावं घेऊ मी? यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. बाकी काय आहे तुमच्याकडे? तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे राज्य हिमाचल प्रदेशही तुम्ही जिंकू शकला नाहीत”, असे शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.

हेही वाचा – ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर; जिल्हाप्रमुखांनी मारहाण केल्याचा दावा अंधारेंनी फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

पण फडणवीसांवर टीका करताना “या देशात ३६ राज्य आहेत. ३६ मधल्या १६ चा आकडा काय घेऊन सांगताय? केलेल्या या वक्तव्यामुळे राऊतांना टीकेचा सामना करवा लागतोय. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी त्यांचे हेच वाक्य धरून ठेवले. त्यामुळे त्यांना सध्या ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, संजय राऊत यांचं भूगोल कच्चे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कारण देशात २८ राज्यं आहेत. (एकूण 28 राज्यं आणि 8 केंद्रशासित प्रदेश) ‘राऊतजी देशात ३६ नव्हे तर २८ राज्य आहेत.’ अस राऊतांना सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – BJP : पक्ष बळकट करणं आमचं काम, चार मतदारसंघाचा आढावा घेणार – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -