घरताज्या घडामोडीचांगले निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; संजय राऊतांची प्रतिक्रिया

चांगले निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यात अनेक चांगली कामे केल्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत यांनी गुरूवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यात अनेक चांगली कामे केल्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत यांनी गुरूवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. तसेच, त्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले. याशिवाय ‘मी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहे’, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसच राज्याचे नेतृत्व करीत आहेत

- Advertisement -

“राज्यात अनेक चांगली कामे केल्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीसच राज्याचे नेतृत्व करीत आहेत. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे मी त्यांची भेट घेणार आहे. शिवाय, माझे काम ज्या विभागात आहे, ते सरकारी विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, म्हणून मी त्यांची भेट घेणार आहे. मी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहे”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

“काही निर्णय सरकारने चांगले घेतले. मी त्यांचे स्वागत करतो. विरोधासाठी विरोध नाही करणार. ज्या गोष्टी राज्यासाठी आणि जनतेसाठी चांगल्या होतात. त्याचे स्वागत केले पाहिजे. अनेक निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले घेतले”, असेही राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

तरुंगात राहणे खूप कठीण असते

“तरुंगामध्ये होतो. तीन महिन्यानंतर हाताला घड्याळ लावले. तरुंगामध्ये घड्याळ घालण्यास बंदी आहे. तरुंगात राहणे चांगली गोष्ट नाही. कोणाला वाटत असेल की, लोक मजा-मस्ती राहतात, तर तसे नाही. तरुंगात राहणे खूप कठीण असते. म्हणूनच तरुंगाची कल्पना तयार करण्यात आली आहे. पण मी आता बाहेर आलोय. कार्यकर्त्यांनी आणि इतर लोकांनी माझे जल्लोष स्वागत केले. मला वाटले होते की, तीन महिन्यानंतर लोक मला विसरली असतील, पण कालपासून बघतोय”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार

“मी आता उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी जाणार आहे. कालपासून उद्धव ठाकरेंचे सतत माझ्याशी बोलणे होत होते. आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचाही मला फोन आला होता. शरद पवार पण आजारी आहेत. पण शरद पवारांना माझ्याबद्दल काळजी होती, अजूनही आहे. त्यामुळे मी शरद पवारांची भेट घेणार आहे”, असेही राऊत यांनी म्हटले.

मला आणि माझ्या पक्षाला भोगायचे होते, ते आम्ही भोगले

“काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मी कोणावर टीका करणार नाही. ईडीवर आणि ज्यांनी हे षडयंत्र रचले होते त्यांच्यावर मी टीका करणार नाही. हे करून त्यांना आनंद मिळत असेल, तर त्यांच्या आनंदात मी सहभागी असेन. पण माझ्या मनात कोणाविरोधात तक्रार नाही. मी कोणाविरोधात तक्रार करणार नाही. जे मला आणि माझ्या पक्षाला भोगायचे होते, ते आम्ही भोगले. माझ्या कुटुंबाने खूपकाही गमावले”, अशा शब्दांत विरोधकांनी राऊतांनी टोला लगावला.

“मी कोणत्याच यंत्रणांना दोष देणार नाही. ना केंद्रीय यंत्रणांना दोष देणार नाही. चांगले काम करण्याची त्यांनी संधी मिळाली, त्यांनी केली. तीन महिने मी तुरुंगामध्ये होते. माझी तब्येत तुरुंगामध्ये खराब होती. आताही खराब आहे. तुरुंगामध्ये कोणीही नसते. तरुंगातील मोठ-मोठ्या भिंतींशी बोलत राहावे लागते”, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंच्या वक्तव्याला राऊतांचे प्रत्युत्तर

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मला ईडीने अटक केल्यानंतर म्हटले होते की, संजय राऊत यांना ईडीने अटक केली. तर त्यांना मला सांगायचे आहे की, हो ईडीने मला अटक केली. ती बेकायदेशीर होती, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. राजकारणामध्येही तुम्ही शत्रूच्या संदर्भात अशा भावना आपण व्यक्त करू नये की तो तुरुंगात जावा. मी एकांतात होतो, जसे स्वातंत्र्यावीर सावरकर आणि लोकमान्य टीळक एकांतात होते. आणीबाणीतले अनेक नेते एकांतात होते. तसेच, माजी अटक राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कार्णी लावला.


हेही वाचा – …म्हणून पत्रावाला चाळ प्रकरणात शरद पवारांचे नाव, पीएमएलए कोर्टाकडून ईडीची कानउघाडणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -