Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशThackeray group on unemployment : अल्पउत्पन्नवाल्यांना फुकट राशन देणार? ठाकरे गटाचा मोदींना...

Thackeray group on unemployment : अल्पउत्पन्नवाल्यांना फुकट राशन देणार? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

Subscribe

14 मोठ्या राज्यांत बेरोजगारीचा उद्रेक आहे. त्यात पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी राज्ये सामील आहेत. महाराष्ट्रात जेमतेम 56 टक्के लोकांना रोजगार आहे आणि बाकीचे लोक मोकळे आहेत.

(Thackeray group on unemployment) मुंबई : केंद्रातील मोदी सरकार म्हणते, देशात बेरोजगारी घटली आहे आणि लोकांचे बरे चालले आहे. ज्यांच्याकडे रोजगार आहे, त्यातील 78 टक्के लोकांची कमाई महिन्याला 15 हजारांच्या खाली आहे. स्वयंरोजगारवाल्यांची कमाई 8 हजारांच्या खाली आहे. मोदी यांचे सरकार आता या सगळ्यांनाही फुकट सरकारी राशन देणार काय? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group targets Modi government on the issue of unemployment)

देशावर आज रोजगाराचे महासंकट कोसळले आहे. देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. त्यात चाळीस टक्के लोक हताश-बेरोजगार आहेत. मोदी यांनी 81 कोटी लोकांना महिन्याला फुकट सरकारी राशन देऊन पोट भरण्याची व्यवस्था केली आहे. याचा अर्थ देशातील 81 ते 85 कोटी लोक हे बेरोजगार आहेत. त्यांना फुकट राशन देणे हा त्यावरचा उपाय मोदी यांनी शोधला आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Political Crisis : मु्ख्यमंत्रिपद सोडले आणि शिंदेंनी भाजपाकडे मागितले थेट गृह खाते, दिल्लीत काय घडले?

जे आकडे समोर आले आहेत ते धक्कादायक आहेत. 14 मोठ्या राज्यांत बेरोजगारीचा उद्रेक आहे. त्यात पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारसारखी राज्ये सामील आहेत. महाराष्ट्रात जेमतेम 56 टक्के लोकांना रोजगार आहे आणि बाकीचे लोक मोकळे आहेत. सरकारी नोकर भरती, सार्वजनिक उपक्रमांतील भरती बंद आहे. साधारण 25 लाख सरकारी पदे रिकामी आहेत आणि पेपर लीक घोटाळ्यात लाखो नोकऱ्या अडकून पडल्या आहेत, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

भरती निघते तेव्हा एका एका पदासाठी हजारो अर्ज येतात. नोकर भरतीच्या ठिकाणी बेरोजगारांची चेंगराचेंगरी होते. शिक्षक, पोलीस, होमगार्ड भरतीच्या वेळी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. मोदी यांनी तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली ‘अग्निवीर’सारखी भंपक योजना आणली. ती फेल गेली. भारतीय सैन्यात कंत्राटी लोक नेमण्याची त्यांची योजना अनोखीच होती, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

मोदी सरकारतर्फे अकुशल कामगारांना इस्रायलमध्ये नोकऱ्यांवर पाठविण्याची योजना प्रसिद्ध झाली, पण या नोकऱ्या भारतीय तरुणांना मरणाच्या खाईत ढकलणाऱ्या ठरल्या. इस्रायलमध्ये नोकऱ्या देणे हा निर्घृण प्रकार होता. तोसुद्धा अपयशी ठरला, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group on unemployment: Thackeray group targets Modi government on the issue of unemployment)

हेही वाचा – BJP : भाजपात बंडखोरांच्या घरवापसीला आता निष्ठावंतांचा विरोध; नेमकं प्रकरण काय?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -