…म्हणून मी राजीनामा दिला; अखेर उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण

उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हाच संपूर्ण प्रकरणात कळीचा मुद्दा ठरला आहे. आता ठाकरे यांनी राजीनामा का दिला याबाबत खुलासा केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत असताना एक महत्त्वाचा मुद्द्यावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणालं की, उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून राजीनामा दिला नसता तर राज्यात जुनं सरकार पुन्हा आणता आलं असतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हाच संपूर्ण प्रकरणात कळीचा मुद्दा ठरला आहे. आता ठाकरे यांनी राजीनामा का दिला याबाबत खुलासा केला आहे. ( Thackeray group president Uddhav Thackeray told the reason behind his resignation )

ठाकरे म्हणाले की, ज्या शिवसेनेने, बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना मोठं केलं. पक्षाने ज्यांना सर्व पदे दिली. त्या माझ्या लोकांनी माझ्यासोबत गद्दारी करणं, हे मला अजिबात पटलं नाही. तसचं, माझ्याचं लोकांनी माझ्याविरोधात बोलावं, हे मला सहन झालं नसतं आणि म्हणून मी राजीनामा दिल्याचं, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, गद्दारांनी अविश्वास प्रस्ताव आणणं मला मान्य नव्हतं म्हणून मी राजीनामा दिला, असं वक्तव्य ठाकरे म्हणाले.

ठाकरेंनी इतर नेत्यांचं न ऐकता भावनिक निर्णय घेत, राजीनामा दिला का? या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की तो आमच्या घराण्याचा गुणे किंवा दोष असावा, परंतु ज्यांना आमच्या पक्षानं सर्व दिलं त्यांनी गद्दारी केली, ते मला पटलेलं नाही. विश्वासघात केलेल्यांकडून जर मला विश्वासदर्शक ठरावाला सामोर जावं लागत असेल तर ते मला अयोग्य वाटलं आणि म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं निरीक्षण )

मी राजीनामा दिलं हे चुकीचं 

कायदेशीररित्या मी राजीनामा दिला हे चुकीचं असू शकतं. परंतु, नैतिकतेच्यादृष्टीने मी घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचं, ठाकरेंनी म्हटलं आहे. तसचं गद्दार माझ्याकडे बोट दाखवतील, हे मला मान्य नव्हतं म्हणून मी राजीनामा दिल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं.