घरमहाराष्ट्रअंधारेंच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयामुळेच आमच्यात मतभेद, वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश

अंधारेंच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णयामुळेच आमच्यात मतभेद, वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गचट निर्माण झाले आहेत. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा नवा राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. दरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे, यात ठाकरे गटातील आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. अशात सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश पार पडला.

- Advertisement -

दरम्यान अॅडव्होकेट वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे हे घटस्फोटानंतर एकमेकांपासून वेगळे राहतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अॅड वैजनाथ वाघमारे यांनी घटस्फोटामागचं कारण सांगितलं आहे. वैजनाथ वाघमारे म्हणाले की, मी सुषमा अंधारेंच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच आमच्यात मतभेद झाले, तेव्हापासून आमचा काहीही संबंध नाही. असा खुलासा वाघमारे यांनी केला आहे.

वाघमारे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे अंधारे या बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व दावे सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावले आहेत. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी येणार कोणताही वार झेलण्यासाठी तयार आहे. कोणी कोणत्या पक्षात जावं आणि कुठे जाऊ नये याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. त्याविषयी मी बोलणं योग्य नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


‘हर हर महादेव’च्या चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांना नोटीस, 7 दिवसांचा दिला अल्टिमेटम

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -