घरमहाराष्ट्रThackeray Group : ठाकरे गटाच्या अडचणीत पुन्हा वाढ; आता देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून...

Thackeray Group : ठाकरे गटाच्या अडचणीत पुन्हा वाढ; आता देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा

Subscribe

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने तर ठाकरे गटाला धक्का देणारा ठरला. या निकालाचे विश्लेषण (चिरफाड) ठाकरे गटाने 16 जानेवारी रोजी महापत्रकार परिषद घेऊन केलं.

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटातील नेत्यांवर ईडीकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. काहींची चौकशी करण्यात आली असून, काहींना समन्स बजावण्यात आले आहेत. अशातच आता ठाकरे गटातील नेते अनिल देसाईंचे निकटवर्ती आणि खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Thackeray Group Thackeray Groups Troubles Rise Again Now a case by ED against Desais PA)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने तर ठाकरे गटाला धक्का देणारा ठरला. या निकालाचे विश्लेषण (चिरफाड) ठाकरे गटाने 16 जानेवारी रोजी महापत्रकार परिषद घेऊन केलं. त्यांनंतर ठाकरे गटाच्या अडचणीत खऱ्या अर्थाने वाढ झाल्याचे बोलले जात आहे. कारण, 17 जानेवारी रोजी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर राजन साळवी यांच्यावर एसीबीने छापेमारी केली. याआधी खासदार संजय राऊत, किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आता ठाकरेंच्या एका मोहऱ्याची भर पडली आहे. ते आहेत अनिल देसाई. कारण, अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटेंच्या चौकशीतून काय समोर येतं हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा : Sugarcane: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट; एफआरपीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांचे खासगी सचिव असलेले दिनेश बोभाटे यांनी 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिनेश बोभाटे यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. आता ईडीकडूनही गुन्हा दाखल केलाय. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : दिल्लीत काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाचा तिढा सुटला

नाना पटोलेंनी साधला सरकारवर निशाणा

अनिल देसाई यांचे खासगी सचिव असलेले दिनेश बोभाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाकडून अद्याप कुठली अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कारवाई प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर या कारवाया सुरु आहेत. अजित पवारांवर का कारवाई झाली नाही? आदर्श घोटाळ्याचा आदल्या दिवशी उल्लेख केला दुसऱ्या दिवशी राज्यसभा दिली असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -