(Thackeray group vs BJP) मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित आघाडीला चारशे जागा जिंकून संविधान बदलून टाकायचे होते, पण आपण भारतीय लोक शहाणे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे मनसुबे उधळले गेले, पण म्हणून मोदी आणि त्यांचे लोक स्वस्थ बसलेत असे नाही. स्वार्थासाठी त्यांची कपट-कारस्थाने चालूच आहेत. कारण मोदी आणि त्यांच्या लोकांनी भारतीय संविधानाचे एकही पान वाचलेले नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group accuses BJP of plotting to change the constitution)
संविधान दिनाचा सरकारी कार्यक्रम संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. त्याच वेळी काँग्रेसने संविधान दिनाचा त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दिल्लीत साजरा केला. ‘‘मोदी यांनी देशाचे संविधान वाचले नाही!’’ असा टोला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मारला. देशाची सध्याची स्थिती पाहता राहुल गांधी खरेच बोलले याविषयी शंका वाटत नाही, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.
हेही वाचा – Politics : मोदी सरकारचा संविधान दिवस धक्कादायक नाही; ठाकरे गटाची बोचरी टीका
संविधान दिनी राहुल गांधी यांनी मोदी यांना उघडे पाडले आहे. मोदी संसद चालू देत नाहीत. अदानीच्या भ्रष्ट कारभारावर विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले की, त्यांचा माईक बंद पाडला जातो. मोदी यांना संसदेत तसेच विधानसभेत विरोधी पक्षच नको आहे. मुळात त्यांना लोकशाही नकोय आणि संविधानाचे राज्य नकोय. त्यांना ‘फोडा, झोडा, राज्य करा व देश लुटणाऱ्यांना पाठबळ द्या’ हेच धोरण राबवायचे आहे, असे आरोपही ठाकरे गटाने केला आहे.
विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या राज्यांना मोदी कस्पटासमान लेखतात. ही काय संविधानाची शिकवण आहे? समता, समान न्यायाचे तत्त्व येथे उद्ध्वस्त झाले आहे. हम करे सो कायद्याला संविधानात स्थान नाही. लोकशाहीचे चारही स्तंभ गुलाम करून कोणी संविधान उत्सवाचा डंका वाजवत असेल तर ते ढोंग आहे, असे सांगून, संविधान वाचा आणि मग बोला, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. (Thackeray group vs BJP: Thackeray group accuses BJP of plotting to change the constitution)
हेही वाचा – New Govt : …तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लागली असती, संजय राऊत असे का म्हणाले?