Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर ठाकरे गटाचे लक्ष अमरावती लोकसभेवर, नवनीत राणांसमोर उभे करणार आव्हान

ठाकरे गटाचे लक्ष अमरावती लोकसभेवर, नवनीत राणांसमोर उभे करणार आव्हान

Subscribe

महानगरपालिकेच्या निवडणुका देखील याच वर्षी लागण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आलेले आहे. ठाकरे गटाने देखील आज राज्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती.

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने सुनावताच ठाकरे गट अॅक्शन मोडमध्ये आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका देखील याच वर्षी लागण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आलेले आहे. ठाकरे गटाने देखील आज राज्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभांबाबत रणनिती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – मविआत बिघाडी? बैठकीत न ठरलेले मुद्देही मुलाखतीत मांडले, भास्कर जाधवांची तीव्र नाराजी

- Advertisement -

ठाकरे गटाकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती लोकसभा लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून या दोन्ही मतदारसंघातून उमेदवार विजयी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून माजी खासदार चंद्रकांत खैरे किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर मोछे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. तर अमरावतीतून खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. परंतु, अमरावतीची जागा ही राखीव आहे आणि मी त्या प्रवर्गात बसत नसल्याने या चर्चा निरर्थक आहेत. माझ्यापर्यंत लोकसभा लढण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाल्याची माहिती नाही, अशी माहिती ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्याने 2024 च्या निवडणुकांसाठी या तीन पक्षांमध्ये नेमका कोणता फार्मुला ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभेसाठी 16-16-16 जागा अशा पद्धतीने जागा वाटप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे.

- Advertisment -