घरठाणेजिल्हा परिषदेसाठी ठाकरे गटांकडून मेळाव्यांचा धडाका

जिल्हा परिषदेसाठी ठाकरे गटांकडून मेळाव्यांचा धडाका

Subscribe

शहापूर । उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शहापूर तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात शिवसैनिकांच्या मेळाव्यांचा आणि शाखा नूतनीकरणांचा जोरदार धडाका सुरू केला आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये घेण्यात येणार्‍या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार असा ठाम निर्धार या मेळाव्यांमधून केला जात आहे.

नुकत्याच झालेल्या शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने बाजी मारली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही निर्विवाद भगवा फडकविण्याचा ठाम निर्धार जिल्हा परिषद गटात घेण्यात येणार्‍या मेळाव्यांमध्ये केला जात आहे. शहापूर तालुक्यात जिल्हापरिषदेचे 14 गट असून तालुक्यातील किन्हवली, मळेगाव, गोठेघर, चेरपोली, बिरवाडी व आवाळे या जिल्हापरिषद गटात झालेल्या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या मेळाव्यांचा माध्यमातून कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात असून पक्ष वाढीसाठी ध्येय धोरणे आखली जात आहेत.

- Advertisement -

शाखा नूतनीकरणाच्या माध्यमातून कातबाव, नडगाव, दहिगाव यांसह विविध ठिकाणी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडीच्या नियुक्त्या करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येत आहे. पुढील महिन्याभरात उर्वरित शिरोळ, मोखावणे, साकडबाव, डोळखांब, वासिंद, आसनगाव, नांदगाव व सोगाव या गटांमध्ये मेळावे होणार असून शाखा नूतनिकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तालुकाप्रमुख बाळा धानके यांनी सांगितले. या मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख विश्वास थळे, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे, तालुकाप्रमुख बाळा धानके, विठ्ठल भेरे, गणेश राऊत, जयवंत तारमळे, ज्ञानेश्वर तळपाडे, अरुण कासार, रवींद्र लकडे, रश्मी निमसे, गुलाब भेरे, अश्विनी वारघडे, युवासेनेचे योगेश लुटे, स्वानंद शेलवले, विनोद केणे यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -