Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रThackeray Vs Fadnavis : टाकाऊ लोकांची टोळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, ठाकरेंचे टीकास्त्र

Thackeray Vs Fadnavis : टाकाऊ लोकांची टोळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, ठाकरेंचे टीकास्त्र

Subscribe

राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यापेक्षा ‘आरोप’ करणाऱ्या त्या पीडित महिलेवर बेअदबीचा खटला आणि हक्कभंग दाखल करण्याची हिंमत दाखवावी.

मुंबई : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून स्थानिक पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले. तथापि, मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उघडे केले. धनंजय मुंडे, जयकुमार गोरे, जयकुमार रावल, संजय राठोड अशा टाकाऊ लोकांची टोळी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहे. त्यातले धनंजय मुंडे गेले. इतरांनाही जावेच लागेल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Thackeray Vs Fadnavis: Thackeray’s criticism of Fadnavis’ cabinet)

राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यापेक्षा ‘आरोप’ करणाऱ्या त्या पीडित महिलेवर बेअदबीचा खटला आणि हक्कभंग दाखल करण्याची हिंमत दाखवावी. गोरे यांनी तसे केले नाही. कारण संबंधित महिलेला पाठवलेले स्वतःचे 300 नग्न आणि अश्लील फोटो आजही कोर्टाच्या कस्टडीत आहेत. हे सर्व फोटो तसेच गोरे यांनी केलेले अश्लील चॅटिंग कोर्टानेच जनहितार्थ समोर आणावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केले आहे.

हेही वाचा – SS UBT : विरोधी पक्षांत लोकशाहीची बूज असेल तर…, उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेने जयकुमार गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली. गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला, असे ती महिला म्हणते. ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली आणि खटला मागे घेण्याची विनवणी केली. यापुढे पुन्हा त्रास देणार नाही, असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला. याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोरे यांनी याआधी साताऱ्यातील एक शिक्षण संस्था आणि त्यांचे कॉलेज हडपण्यासाठी देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात सडवले. देशमुखांच्या घरातील महिला तसेच मुलांनाही या गोरे यांनी सोडले नाही. गोरे यांची कृत्ये महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहेत. पुन्हा ही कृत्ये प्रसिद्ध करू नयेत हा त्यांचा माध्यमांवर दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti Govt : हे राज्य शिवरायांचे नसून मोदींचे झाले…, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल