घरमहाराष्ट्रThackeray Vs Rane: "कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत"; उद्धव ठाकरेंनी राणेंना होमग्राऊंडवर ललकारले

Thackeray Vs Rane: “कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत”; उद्धव ठाकरेंनी राणेंना होमग्राऊंडवर ललकारले

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री दीपक केसरकर हे 'डबल गद्दार' असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.

सावंतवाडी : ‘आज रविवार आहे, तर कोंबडी वडे झालेच पाहिजे. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत’, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्री मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातूनच त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीत आज जनसंपर्क सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केल आहे. उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांना ‘डबल गद्दार’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.

नारायण राणेंवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना. आता त्याचे जे काही करायचे होते, पिसे काढायची ती तुम्हीच काढलेली आहात. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढली आहेत. आणखीन काही नवीन उगवली असतील तर ती पण उपटून टाका आणि मी इथे आलोय उगाच माझे तोंड खराब करून घ्यायला आलेलो नाही. “, अशी टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ganpat Gaikwad : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; गणपत गायकवाडांवर Atrocity दाखल

कपाळावर गद्दारीचा शिक्का लागला

दीपक केसरकरांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “इथला डबल गद्दार, त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, उब मिळत असेल. पण त्यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का लागलेला आहे. तो ते कधीही आयुष्यात पुसू शकत नाहीत. दर आठवडा आणि 15 दिवसांनी शिर्डीला जातात. मला वाटले होते की, देवाधर्माचा माणूस दिसतोय, त्यांच्याकडे श्रद्धा आणि सबुरी असेल. पण कोणत्याही पक्षावर श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -