घरताज्या घडामोडीठाकरेंचे ‘मिशन’ नाशिक : संघटनात्मक आढावा घेणार

ठाकरेंचे ‘मिशन’ नाशिक : संघटनात्मक आढावा घेणार

Subscribe

पदाधिकार्‍यांशी वन-टू-वन चर्चा करणार

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक पालिका ताब्यात घेण्यासाठी मनसेने थेट अमित ठाकरे यांनाच मैदानात उतरवले आहे. मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल झाले असून ते पदाधिकार्‍यांशी वन-टू-वन चर्चा करणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यावेळी अमित ठाकरे आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेही सोबत होते. मंगळवारी राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंसह काही नेत्यांना बॅगा भरून कृष्णकुंजवर येण्याचे आदेश दिले होते. राज ठाकरे हे पुणे दौर्‍यावर असून त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे नाशिक दौरयावर आले आहेत. त्यांच्यासोबत संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisement -

मतदारसंघांचा आढावा घेणार
अमित ठाकरे यांनी गेल्याच आठवडयात नाशिकमध्ये येत पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले. आता पुन्हा अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून या दोन दिवसात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधणार आहेत. राजगड या मनसेच्या कार्यालयात या मुलाखती होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखती होणार असून त्यात मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच संभाव्य उमेदवारही हेरण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -