घरठाणेसंरक्षण भिंत पडल्यानंतर मुलुंड-ठाण्याचा रस्ता बंद

संरक्षण भिंत पडल्यानंतर मुलुंड-ठाण्याचा रस्ता बंद

Subscribe

ठाणे: वागळे इस्टेट,श्रीनगर येथील मे.टाटा फैजेन कंपनीची सुमारे २५ फूट लांब व ०५ फूट उंच संरक्षण भिंत जवळच असलेल्या रोडवरती व नाल्यामध्ये पडली. याचदरम्यान जवळ असलेल्या विश्राम टॉवर क्रमांक-४ ची संरक्षण भिंतीला तडा जाऊन ती धोकादायक स्थितीत आली आहे. या घटनांमुळे मुलुंडमधून ठाण्यामध्ये येणारा पायवाटीचा रहदारीचा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला होता. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisement -

माजी नगरसेवक गुरुमुख सिंग यांनी दूरध्वनी करत आपत्ती व्यवस्थापन कक्षेत, वागळे इस्टेट, श्रीनगर, सेक्टर क्रमांक-३, विश्राम टॉवरच्या जवळ, मे. टाटा फैजेन कंपनीची संरक्षण भिंत जवळच असलेल्या रोडवरती व नाल्यामध्ये पडली. तसेच जवळ असलेल्या विश्राम टॉवर क्रमांक-४ ची संरक्षण भिंतीला तडा जाऊन ती धोकादायक स्थितीत आल्याची तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी व वागळे प्रभाग समितीचे उप अभियंता (सार्व. बांधकाम विभाग) व कनिष्ठ अभियंता (सार्व. बांधकाम विभाग) यांनी धाव घेतली.

- Advertisement -

सुरुवातीला या घटनेत कोणाला दुखापत झाली आहे का? याची विचारणा केली. त्यावेळी कोणालाही दुखापत झाली नसल्याची स्पष्ट झाले. तसेच खबरदारी म्हणून मुलुंड मधून ठाण्यामध्ये येणारा पायवाटीचा रहदारीचा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.


हेही वाचा : …मग शिवसेना माझी आहे असं म्हणू का?, खासदार उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -