घरठाणेप्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते उल्हासनगर मार्गावर धावणार मेट्रो

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते उल्हासनगर मार्गावर धावणार मेट्रो

Subscribe

सध्या वाहतुकीच्या सुविधा पाहता अनेकांचा अर्ध्याहून अधिक वेळ हा प्रवासातच जातो. लवकरच चाकरमान्यांची या त्रासदायक प्रवासातून सुटका होणार आहे. कारण लवकरच सीएसएमटी ते उल्हासनगर मार्गावर मेट्रो धावताना दिसणार आहे.

घरांच्या वाढत्या किंमतींमुळे आता मुंबई बाहेर लोकवस्ती वाढू लागली आहे ठाणे, कल्याण, त्याही पुढे अंबरनाथ, बदलापूर अगदी उल्हासनगरपर्यंत लोक रहायला जावू लागले आहेत. मात्र, इथे राहणारे लाखो प्रवासी कामानिमित्ताने रोज मुंबईतच येत असतात. सध्या वाहतुकीच्या सुविधा पाहता अनेकांचा अर्ध्याहून अधिक वेळ हा प्रवासातच जातो. लवकरच चाकरमान्यांची या त्रासदायक प्रवासातून सुटका होणार आहे. कारण लवकरच सीएसएमटी ते उल्हासनगर मार्गावर मेट्रो धावताना दिसणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ही आनंदाची बातमी दिली आहे. ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ या मार्गिकेवरील मेट्रो आता थेट उल्हासनगरपर्यंत धावणार आहे. कल्याणमधील खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत हा विस्तार करण्याच मोठा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे कल्याण ते खडकपाडा आणि खडकपाडा ते उल्हासनगर असा 7.7 किमीचा हा मार्ग असणार आहे. दोन टप्प्यात या मार्गाचे बांधकाम होणार आहे.

- Advertisement -

उल्हासनगरपर्यंत विस्तारीत ‘मेट्रो ५’चा बृहत आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएला सल्लागार समितीची नियुक्ती करावी लागणार आहे आणि या संबंधिचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या आगामी बैठीकत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे तब्बल 337 किमीचे जाळे विणण्यात येत आहे. सध्या मेट्रो 5 चे काम सुरू आहे. हा मार्ग 24.9 किमीचा आहे. यासाठी 8 हजार 416 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. तसेच या मार्गावर 17 स्थानकांचा समावेश आहे. यामुळे आता ठाण्याहून कल्याण गाठण्यासाठीचा सुपरफास्ट प्रवास अनुभवता येणार आहे.

- Advertisement -

या मार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिला टप्पा हा ठाणे ते भिवंडी दरम्यानचा आहे. या पहिल्या टप्प्याचे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम हे लवकरच सुरू होणार आहे. आता याच कल्याणपर्यंतच्या ‘मेट्रो ५’ मार्गाचा विस्तार हा उल्हासगरपर्यंत करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

या निर्णयाला महानगर आयुक्त एस. व्ही. श्रीनिवास यांनीही दुजोरा दिला आहे. उल्हासनगरमधील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो 5 चा विस्तार उल्हासनगरपर्यंत झाल्यास सीएसएमटी ते उल्हासनगर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे. हे अंतर अतिजलद पद्धतीने पार करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -