घरठाणेठाणे शहराला मिळणार लवकरच नवीन ओळख

ठाणे शहराला मिळणार लवकरच नवीन ओळख

Subscribe

ई- बसेस लवकरच ठाणेकरांच्या सेवेत

ठाणे । येऊरसारखा जैवविविधतेने नटलेला डोंगर लाभलेले ठाणे शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये आहे. ’स्वच्छ, सुंदर ठाणे’ शहर आता आणखीनच बदलू लागले आहे, शहरातील भिंती बोलू लागल्याने या शहराच्या सौंदर्यीकरणात आणखीनच भर पडत आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहराची वाहिनी समजल्या जाणार्‍या परिवहन सेवेचे बदलते रुप लवकरच ठाणेकरांना अनुभवयास मिळणार आहे. होणार असून ’ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज’ अशा पर्यावरणपूरक ई- बसेस ठाणे शहराला एक नवीन ओळख देणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
स्वच्छ वायू कृती आराखड्याअंतर्गत करण्यात येणार्‍या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (17 जानेवारी) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त तुषार पवार, अनघा कदम, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी व परिवहन सेवेचे अधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रीकल बसेस उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे, यात अत्याधुनिक ई बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत, यासाठीची संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले.
स्वच्छ हवा कृती आराखड्याअंतर्गत महापालिकेस सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 साठी अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानातंर्गत 123 ई बसेस खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. जानेवारी 2023 अखेरपर्यंत 32 ई बसेस प्राप्त होणार असून जून 2023 पर्यत उर्वरित 91 ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत, या बसेस दिलेल्या वेळेतच प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी, जर याकामी विलंब झाला तर करारनाम्यातील अटीनुसार ठेकेदारास दंड आकारला जाईल असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

- Advertisement -

स्मशानभूमींमध्ये गॅस किंवा इलेक्ट्रिक शवदाहिनी
सध्या ज्या स्मशानभूमीमध्ये गॅस किंवा इलेक्ट्रिक शवदाहिनी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, अशा स्मशानभूमीमध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ठाणे शहराने भविष्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रमांच्या आधारे पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे, या प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वच्छ वायू कृती आराखडयाअंतर्गत सर्व स्मशानभूमींमध्ये इलेक्ट्रीक आणि गॅस शवदाहिनी उपलब्धतता करुन द्यावी, असा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देखील आयुक्त बांगर यांनी दिल्या.

अनुदानातून राबविले लोकोपयोगी उपक्रम
तसेच यापूर्वी अनुदानातून वर्तकनगर येथे सायकल मार्गिका, आनंदनगर ईवा स्कूल येथे वृक्ष लागवड, अद्ययावत फिरती प्रयोगशाळा व लोकमान्यनगर येथील स्मशानभूमीमध्ये गॅस शववाहिनी बसविण्याच्या कामासाठी खर्च करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी आयुक्त बांगर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -