घरठाणेठाण्यातून 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त; पालघरचे दोघे गजाआड

ठाण्यातून 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त; पालघरचे दोघे गजाआड

Subscribe

ठाण्यात तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बनावट नोटांप्रकरणी पालघरमधील दोन जणांना अटक करण्यात आली आहे

ठाण्यात तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बनावट नोटांप्रकरणी पालघरमधील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. राम हरी शर्मा (52) आणि राजेंद्र रघुनाथ राऊत (58) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघंही पालघरमधील राहणारे आहेत. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने यासंदर्भातील कारवाई केली आहे. (thane crime 8 crore fake notes seized two accused arrested in palghar)

मिळालेल्या माहितीनुसार, राम हरी शर्मा आणि राजेंद्र रघुनाथ राऊत 2000 रुपयांच्या बनावट नोटा विक्री करण्याकरिता बाजारात आणणार होते. बनावट नोटांची माहिती मिळताच ठाणे गुन्हे शाखेने सापळा रचत कारवाई केली. सद्यस्थितीत पोलीस या प्रकरणातील मास्टर माईंडचा तपास करत आहेत.

- Advertisement -

ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5ने पालघरमधील दोघांना अटक केली आहे. तब्बल 8 कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व नोटा 2 हजारांच्या आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच, याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (ए), 489 (ब), 489 (सी) आणि 34 अन्वये गमोहन कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचाही शोध घेत आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्था अपहार चौघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -