Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे दोन पत्ते काढले तर बेकायदेशीर बंगला कोसळेल, ठाकरे गटाचा शिंदे सरकारला इशारा

दोन पत्ते काढले तर बेकायदेशीर बंगला कोसळेल, ठाकरे गटाचा शिंदे सरकारला इशारा

Subscribe

ठाणे: ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी शिंदे गटावर कार्टूनच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. बेकायदेशीर व्हीप आणि बेकायदेशीर गटनेता हे दोन पत्ते काढले तर शिंदे सरकारचा बेकायदेशीर बंगला कोसळेल, असा इशारा संजय घाडीगांवकर यांनी कार्टूनच्या माध्यमातून दिला आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरून घाडीगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या कार्टूनमध्ये म्हटले आहे की, बेकायदेशीर व्हीप आणि बेकायदेशीर गटनेता हे तळाला असलेले दोन पत्ते काढल्यास त्याच्यावर उभारण्यात आलेला सत्तेचा बंगला कोसळेल असे या कार्टूनमध्ये दर्शविण्यात आले आहे.

- Advertisement -

बेकायदेशीर बंगला हे कार्टून काढताना त्यात सर्वात तळाला बेकायदेशीर गटनेता, बेकायदेशीर व्हीप, त्याच्या वरच्या मजल्यावर शिंदेंनी पळवून नेलेला शिवसेना पक्ष, त्याच्या वरच्या मजल्यावर मंत्रीपदे आणि शेवटच्या मजल्यावर सरकार दर्शवण्यात आले आहे. तळाला असणारे बेकायदेशीर गटनेता व बेकायदेशीर व्हीप हे दोन पत्ते काढण्यासाठी हात पुढे सरसावलेले या कार्टूनमध्ये दाखवण्यात आले आहेत.

- Advertisement -

बेकायदेशीर व्हीप आणि बेकायदेशीर गटनेता हे दोन पत्ते काढल्यास सत्तेचा बेकायदेशीर बंगला कोसळेल असे घाडीगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या या कार्टूनमध्ये दर्शवण्यात आले आहे. घाडीगांवकर यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून हे कार्टून प्रसिद्ध करून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे.


हेही वाचा : ठाकरे गटाचे लक्ष अमरावती लोकसभेवर, नवनीत राणांसमोर उभे करणार आव्हान


 

- Advertisment -