घरउत्तर महाराष्ट्र'त्या' खुनाची अखेर उकल, मनसेच्या पदावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राला संपवले

‘त्या’ खुनाची अखेर उकल, मनसेच्या पदावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राला संपवले

Subscribe

नाशिक : मद्यपार्टीमध्ये मनसेचे पद देण्यासाठी १५ हजार रुपये देण्यास नकार दिल्याने युवकाने मित्रावर चाकू फेकून मारला. त्याचा राग आल्याने मित्राने साथीदाराच्या मदतीने युवकाचा काटा काढला. दोघांनी युवकावर चाकूहल्ला करत दारूची बाटली फोडली, विळ्याने गळ्यावर वार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी एका युवकास अटक केली आहे. प्रवीण मधुकर दिवेकर (४३, रा. हेतल सोसायटी, रामेश्वरनगर, जुना सायखेडा रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तुषार सिद्धार्थ पवार (२९, रा. त्रिवेणी पार्क, इंद्र प्लाझा सोसायटी, व्यापारी बँकेसमोर, जेलरोड) असे मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य संशयित तुषार पवार व मयत प्रवीण दिवेकर यांची एका संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली होती. रविवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघे संशयित दिवेकर यांच्या घरी जेवण व दारु पिण्यासाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची पार्टी सुरू होती. दरम्यान दिवेकर याने तुषार यास ‘मी तुला मनसेचे पद मिळवून देतो, तू मला तुझ्या वडिलांकडून १५ हजार रुपये घेऊन दे’ असे सांगितले. त्यास संशयित तुषार याने नकार दिला असता त्याचा प्रवीण दिवेकर यास राग आला. दिवेकर याने त्याच्याकडील चाकू संशयित तुषार यास मारून फेकले. तुषार बाजूला झाल्याने चाकू त्यास लागला नाही. परंतु, तुषारला त्याचा राग आला. त्याने किचनमध्ये जाऊन दुसरा चाकू आणला आणि प्रवीण याच्या छातीवर, पोटावर सपासप वार केले. त्यानंतर जेवणाचा कुकर मारून फेकला. तसेच जवळच असलेल्या विळीने प्रवीण दिवेकर यांच्या गळ्यावर वार केला. दारुची बाटली प्रवीण यांच्या डोक्यात मारून फोडली. ती बाटली त्याने प्रवीण दिवेकरच्या पोटात खुपसली. त्यात दिवेकर याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

मोबाईल, दुचाकी घेऊन त्र्यंबकेश्वरला पलायन

संशयित दोघांनी प्रवीण दिवेकर यांचा मोबाईल व दुचाकीवरून त्र्यंबकेश्वरला पलायन केले. घटनेची माहिती प्रवीण याने कॉल करून कोणाला सांगू नये म्हणून त्यांनी मोबाईल घेतला होता. संशयित आरोपींनी त्र्यंबक परिसरात चाकू एका ठिकाणी लपवून ठेवला. तर अल्पवयीन मुलाच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने त्यांनी ते कपडे जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर ते आडगावला परत आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -