बँकेवर दरोडा टाकून मॅनेजरची हत्या करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार

विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत दरोडा टाकून बँक मॅनेजरची हत्या करून लुटमार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला जमावाने पकडले होते.

azamgarh crime girl body was found in well police recovered girl head uttar pradesh

वसई : विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत दरोडा टाकून बँक मॅनेजरची हत्या करून लुटमार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला जमावाने पकडले होते. मात्र, शुक्रवारी दुपारी वसई कोर्टाच्या परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो आरोपी पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. (The accused who robbed the bank and killed the manager escapes from the police)

अनिल दुबे असे त्याचे नाव आहे. सध्या तो खून, दरोडा आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे तुरुंगात होता. शुक्रवारी तारीख असल्याने त्याला जेलमधून वसई कोर्टात आणले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास कोर्टाच्या परिसरातून अनिल दुबे पोलीस गार्डांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. दुबे त्याच्या एका साथिदाराच्या मोटारसायकलीवरून पळून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२९ जुलै २०२१ ला संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी घरी निघून गेल्यानंतर बँक मॅनेजर योगिता वर्तक (३४) आणि कॅशियर श्वेता देवरूख दिवसभराचे कामकाज आटोपून कॅश मोजून लॉकरमध्ये ठेवण्याचे काम करत होत्या. त्याचवेळी पूर्वी याच शाखेत मॅनेजर असलेला अनिल दुबे दरोडा टाकण्याच्या इराद्याने आला होता. दुबेला बँकेतील आतील खडानखडा माहिती होती. तसेच तो ओळखीचा असल्याने वर्तक आणि देवरुख यांना त्याचा इरादा लक्षात आला नाही. तेवढ्यात दुबेने चाकूचा धाक दाखवून बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. योगिता वर्तक आणि श्वेता देवरूख यांनी विरोध करत मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे घाबरलेल्या दुबेने दोघांवर चाकून हल्ला केला. त्यानंतर लुटमार करून पळून जात असताना बँकेबाहेर असलेल्या जमावाने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.

या हल्ल्यात योगिता वर्तक यांचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या श्वेता देवरुख यांचे प्राण वाचले होते. विरार पोलिसांनी खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. अटकेनंतर दुबेने त्यावेळी काम करत असलेल्या नायगाव येथील अक्सिस बँकेतही लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आल्यावर तोही गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. कर्जबाजारी झाल्यानेच दुबेने बँक लुटण्याचा डाव रचल्याचे तपासात उजेडात आले होते. तसेच पैशांसाठी त्याने अक्सिस बँकेतही लाखो रुपयांचा घोटाळा केला होता.


हेही वाचा – गौतमी पाटीलच्या डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू; मनसेचा इशारा