घरमहाराष्ट्रवाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांनो सावधान!

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांनो सावधान!

Subscribe

पुण्याच्या वाहतूक पोलिस खात्याकडून पोेलीस शिपायांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांचे व्हिडिओ कैद करण्यात येणार आहे.

वाहतुक पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालणाऱ्यांना आता चांगलाच चोप बसणार आहे. पुण्यामध्ये वाहतूक शाखेकडून वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. या बॉडी कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या वाहन चालकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कायदेशीरपणे कारवाई करण्यात येणार आहे. रेकॉर्डींग झालेले व्हिडओ या कारवाईत पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहे.

पुण्याच्या वाहतूक शाखेची मोहिम

वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित चालू राहावी यासाठी वाहतूक पोलीस सतत प्रयत्नशील राहतात. ऊन असो किंवा पाऊस, दिवस-रात्र ते रस्त्यांवर, महामार्गांवर, सिग्नलवर आपले काम सुरळीतपणे करत असतात. परंतु, काही वाहनचालक वाहतूकीचे नियमभंग करुन पोलिसांशी हुज्जत घालतात. अशा नियमभंग आणि वाद घालणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात पुण्याच्या वाहतूक शाखेकडून विशेष मोहिम राबवली जात असून बॉडी कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

पुण्याच्या वाहतूक शाखेकडून आवाहन

पुण्याच्या वाहतूक शाखेकडून वाहन चालकांना नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता वाहन चालकांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर बॉडी कॅमेऱ्याच्या साहाय्याने कारवाई करण्यात येणार आहे.


हेही वाचा – वाहतूक पोलीस कदम यांनी पकडला विषारी साप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -