घरताज्या घडामोडीलव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे; नवी मुंबईत हिंदू जन आक्रोश...

लव जिहाद विरोधी कायदा लागू झालाच पाहिजे; नवी मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा

Subscribe

नवी मुंबई शहरात प्रथमच हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाज नवी मुंबई शाखेच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन आज रविवार 26 फेब्रुवारी रोजी केले होते. कोपरखैरणे येथील ब्लू डायमंड चौक कोपरी गांव ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली होती.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात प्रथमच हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाज नवी मुंबई शाखेच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन आज रविवार 26 फेब्रुवारी रोजी केले होते. कोपरखैरणे येथील ब्लू डायमंड चौक कोपरी गांव ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली होती. (The Anti Love Jihad Act must be enforced Hindu Jan Aakrosh Morcha in Navi Mumbai)

नवी मुंबईत प्रथमच झालेल्या अशा प्रकारच्या भव्य मोर्चामुळे शहरातील वातावरण भगवे मय झाले होते हिंदुत्वाच्या एकूण १६ संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. जय श्रीराम, जय शिवरायच्या घोषणाबाजी, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषेतील विद्यार्थी त्याचप्रमाणे हातात भगवे झेंडे, डोक्यावर टोपी आणि गळ्यात मफलर टाकून हिंदुत्वाचा नारा दे महिला तरुण तरुणी युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक, भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, नेते, भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हजारोंच्या संख्येने हिंदू समाज बांधव रणरणत्या उन्हात सहभागी झाले होते. या जन आक्रोश मोर्चामध्ये ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समितीचे सभापती अनंत सुतार, भाजपा आयटी सेलचे सतीश निकम, माधुरी सुतार आदी मान्यवर सहभागी झाले होते.

- Advertisement -

लव जिहाद धर्मांतरण व लँड जिहाद विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणी सह धर्म रक्षणासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे हिंदू जन आक्रोश मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले. वाशीतील शिवाजी शिवाजी महाराज चौकात या मोर्चाचा समारोप झाला. अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.लव जिहाद मध्ये बळी पडलेल्या तरुणींना मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लव जिहादला बळी पडणार नाही आणि हिंदूंच्या एकसंघ राहण्यासाठी शपथ घेण्यात आली. मोर्चाचा समारोप हनुमान चालीसा पठण करून करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी जिहादींना देऊ नका – काजल हिंदुस्थानी

- Advertisement -

आतंकवादीचे मुळ कनेक्शन हे लव जिहाद व लैंड जिहाद आहे.आज महाराष्ट्रासह नवी मुंबईत लव जिहादच्या घटना समोर येत आहेत. अनेक जमिनी बळकावून त्याठिकाणी मशिदी बांधल्या जात आहेत. जर आपल्या येणाऱ्या काळात सर्व हिंदूंनी लव जिहाद रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. शूरवीरांची पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी लव जिहादी, आतांकवादाला खतपाणी घालणाऱ्यांना देणार नका, असे आवाहन हिंदू धर्म प्रचारक काजल हिंदुस्थानी यांनी मार्गदर्शन करताना केले.

सरकारने कायदा करावा – आ.गणेश नाईक

मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न केलं जात आहे. यानंतर धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे लव जिहाद विरोधातील कायदा लवकरात लवकर सरकारने केला पाहिजे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी टाकून त्यांना कमजोर केले जात आहे.हे सर्व थांबले पाहिजे लव जिहाद, लँड जिहाद विरोधात लवकरात लवकर कायदा झाला पाहिजे मत, आमदार गणेश नाईक यांनी केला.

हिंदूंच्या संयमांचा अंत पाहू नका – संदीप नाईक

केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकरात लवकर करावा. बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. भारतीयांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे. आज हिंदू समाज संयमी आहे मात्र त्याच्या संयमाचा अंत पाहू नका लवकरात लवकर लव जिहाद विरोधातील कायदा करा, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी केले.


हेही वाचा – मुख्यमंत्री आणि मी पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेल्याने अजित पवारांना पोटदुखी – फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -