घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसेनेने राऊतांना आवर घालणे गरजेचे; खासदार हेमंत गोडसे यांचा घणाघाती आरोप

सेनेने राऊतांना आवर घालणे गरजेचे; खासदार हेमंत गोडसे यांचा घणाघाती आरोप

Subscribe

नाशिक : सकाळी उठायचं, टीव्हीसमोर येऊन बडबड करायची इतकचं काय ते काम खासदार संजय राऊत यांनी केले. राऊतांमुळेे राज्यातील जनमाणसांत पक्षाची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे एखाद्या टोपलीतील सडका कांदा बाजूला ठेवावा, त्याचप्रमाणे राऊत यांना आवर घालणे गरजेचे असल्याचा घणाघात खासदार गोडसे यांनी केला. नाशिक येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे. या खासदारांमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही सहभाग आहे. दिल्लीतील या राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी खासदार गोडसे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी उपनगर येथील इच्छामणी लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्याप्रसंगी खा.गोडसे यांनी खा. राऊतांवर घणाघात करतांना महाविकास आघाडीवरही टिकास्त्र सोडले. गोडसे म्हणाले, आम्ही सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

परंतू शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वीही आम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी आम्ही भाजपसोबत नैसर्गिक युती व्हावी म्हणून शिंदेंना पुन्हा बोलवून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा आणि संजय राऊतांना आवर घालावा, या मागण्या केल्या. भाजपसोबतच्या २५ वर्षे युतीच्या कार्यकाळापेक्षा मागील अडीच वर्षांचा अनुभव अत्यंत खराब होता, असेही ते म्हणाले. राऊतांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याचेही ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिल्याचे ते म्हणाले. यावेळी भाऊलाल तांबडे, सरपंच परिषदेचे नानाजी गायकर, प्रेस कामगार युनियनचे सेक्रेटरी जगदीश गोडसे, त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्थ भूषण अडसरे, नासाका माजी चेअरमन तानाजी गायधनी, वैद्यकीय मदत कक्षप्रमुख योगेश म्हस्के, महादेवपूरचे सरपंच विलास सांडखोरे, कांचनगाव विकासोचे बाळाभाऊ गव्हाणे, इगतपुरी तालुका नेते देविदास जाधव, लक्ष्मीबाई ताठे, दत्ता सुजगुरे, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे मुन्ना शेख, कपिलदेव शर्मा आदी उपस्थित होते.

बडगुजर कोणाचे काम करतात सर्वांनाच माहीत

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खासदार गोडसे यांच्यावर तोफ डागत अपशब्द वापरले. याचा समाचार घेताना खासदार गोडसे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत मला डावलण्यासाठी अपूर्व हिरे यांना मातोश्रीवर घेऊन जाणारे बडगुजर हे कोणाचे समर्थक आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण करत त्यांनी पक्षात अनेकांचा विरोधही पत्कारला होता. त्यामुळे त्यांच्याविषयी पक्षात नाराजी असून बडगुजर यांनी मला निष्ठा शिकवू नये, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

खासदार हेमंत गोडसेंनी केले हे आरोप…

  • महाविकास आघाडीत ८० टक्के निधी एकाच पक्षाला मिळत होता
  • संपादकाने संपादकाचेच काम करावे राऊतांनी जनतेच्या प्रश्नावर किती आंदोलने केली
  • शिंदेंनी पाऊल उचलले नसते तर दुसर्‍या दरवाजानं राष्ट्रवादी युतीसाठी तयार होती
  • माजी पालकमंत्र्यांनी विकासकामात खोडा घातला
  • शिंदे गटाने राज्यसभा, विधानपरिषदेत मतदान करून पक्षासोबत निष्ठा जोपासली
  • भाजपसोबत युती करावी म्हणून वारंवार उध्दव ठाकरेंशी चर्चा
  • उध्दव ठाकरे युतीसाठी तयार, परंतू कार्यवाही होत नव्हती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -