घरमहाराष्ट्रकरोनासोबत जगण्याचे आर्ट ऑफ लिव्हिंग शिकले पाहिजे

करोनासोबत जगण्याचे आर्ट ऑफ लिव्हिंग शिकले पाहिजे

Subscribe

आपण करोनासोबत जगण्याचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने पाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे. बाहेर वावरताना मास्क लावलाच पाहिजे. एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. तसेच सॅनेटायझरचा वापर हा ऑफिसमध्ये किंवा घरात प्रवेश करण्याआधी आणि बाहेर पडताना केला पाहिजे असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मॉल्स, सलोन्स, ब्युटी पार्लर्स कधी सुरु होतील हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना हे लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी या ठिकाणी कोणतीही गर्दी न करता विशिष्ट अंतर पाळणं आवश्यक आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर राज्य सरकार या संदर्भात जे निर्देश आणि नियम आखून देईल त्याचं पालन करणंही महत्त्वाचं आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -