घरCORONA UPDATEवांद्र्याची गर्दी हे राज्य सरकारविरोधात षडयंत्र; संजय राऊत

वांद्र्याची गर्दी हे राज्य सरकारविरोधात षडयंत्र; संजय राऊत

Subscribe

राज्य सरकारवर विरोधक ताशेरे ओढत असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.

राज्यात लॉकडाऊन असताना देखील वांद्रे पश्चिम येथे मोठ्या संख्येने मजूर जमल्याची घटना घडली होती. यावरून राज्य सरकारवर विरोधक ताशेरे ओढत असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. वांद्रेतील घटना राज्य सरकारला अडचणी आणण्यासाठी घडवून आणली गेली, तसेच ही घटना ठरवून झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली. एवढेच नाही तर पालघर घटनेबाबत देखील त्यांनी भाष्य केले.
पालघर घटना अफवेतून
दरम्यान पालघर येथे जमावाने केलेली हत्या ही
अफवेतून झालेला अपघात होता. तो घातपात नाही, तर तो एक अपघात होता असे देखील संजय राऊत यावेळी म्हणालेत. पालघरमध्ये आधी तिथे विशिष्ट विचाराच्या लोकांनी साधूच्या वेशात जिहादी फिरत आहेत सावध रहा, अशा प्रकारचे मेसेज पसरवून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. आणि यातून झालेली हत्या आहे असे राऊत म्हणालेत. त्यामुळे साधूच्या वेशातून जिहादी फिरताहेत असे मेसेज पसरवणारे कोण होते असा सवालच संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
याचमुळे आता बोंबा मारत आहेत
दरम्यान पालघर घटनेवरून संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाण साधत आज दुर्दैवानं दोन साधुंची हत्या होऊनही या महाराष्ट्रात दोन धर्मात तेढ निर्माण झाली नाही. दंगल उसळली नाही याचे दुःख असल्याची टीका राऊत यांनी केली. तसेच तेच आज पालघरच्या घटनेविषयी आकांडतांडव करत आहेत. त्यांना या घटनेचं दुःख कमी आहे. त्यांचं दुःख इतकंच आहे की, त्यांच्या मनासारखं काही झालं नाही. म्हणून ते जोरात बोंबा मारत असल्याची टीका राऊत यांनी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -