नागपूर : आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन नागपूरच (Nagpur) सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केलं, असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केला. (The boast of Nagpurs development for the benefit of the wealthy Thackeray groups serious accusation against the rulers)
अंबादास दानवे यांनी आज नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन पूरग्रस्त नागपूरकरांशी त्यांनी संवाद साधला. या घटनेला नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हे ही तितकेच जबाबदार असून यांच्यात समनव्य नसल्याचे दिसून आल्याचे दानवे यांनी म्हणत प्रशासन यंत्रणेच्या कारभारावरही त्यांनी बोट ठेवलं.
हेही वाचा – ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट; काय झाली चर्चा?
प्रशासन यंत्रणा घटना घडण्याची वाट बघत होते का अशी स्थिती आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मात्र या भिंतीचे काम हे चार टप्प्यात होणार होत. पहिल्या टप्प्याच काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
हेही वाचा – पराभवाच्या भितीपोटी नैराश्येतून नरेंद्र मोदींची काँग्रेसवर पातळी सोडून टीका; नाना पटोलेंचा पलटवार
सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याच काम नव्याने करावं लागेल अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीचे चारही टप्प्यांच्या कामाचा
नव्याने डीपीआर बनवून काम लवकरात लवकर हाती घ्यावं, या कामात आमचं सहकार्य राहील अशा सूचना जिल्हाधिकारी यांना केल्याचे दानवे म्हणाले. प्रशासन यंत्रेणवर नसलेलं नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावं लागत असेल तर, हे दुर्दैव असल्याची टीका दानवे यांनी केली. यावेळी संपर्क प्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी खासदार प्रकाश जाधव, सुरेखा खोब्रागडे जिल्हा संघटिका, शिल्पा बोडखे पूर्व विदर्भ महिला संघटिका, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व पदाधिकारी उपस्थित होते.