घरमहाराष्ट्रखळबळजनक! पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

खळबळजनक! पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला

Subscribe

विशेष म्हणजे मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव महेश लोले असून, तो कोल्हापुरातील रहिवासी आहे. एसटी कर्मचारी महेश लोलेंच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीच्या जखमा नव्हत्या. परळ एसटी आगारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सारथी रेस्टॉरंट अँड बारच्या बाहेर हा मृतदेह सापडलाय.

मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर निवासस्थानी हल्ला केल्यानं वातावरण चांगलेच ढवळून निघालेय. त्याच दरम्यान मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी रात्री एका एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह परळ एसटी आगराजवळ आढळून आलाय. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळलंय. एसटी कर्मचाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद दादर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आलाय.

विशेष म्हणजे मृत एसटी कर्मचाऱ्याचे नाव महेश लोले असून, तो कोल्हापुरातील रहिवासी आहे. एसटी कर्मचारी महेश लोलेंच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीच्या जखमा नव्हत्या. परळ एसटी आगारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सारथी रेस्टॉरंट अँड बारच्या बाहेर हा मृतदेह सापडलाय. त्यानंतर घटनास्थळी लागलीच पोलीस जमा झाले असून, दादर पोलीस ठाण्यात महेश लोले यांच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

- Advertisement -

तसेच त्यांच्या मृतदेह उत्तर तपासणीसाठी सायन रुग्णालयात पाठवला आहे. एसटी कर्मचारी हे एसटी आंदोलनासाठी कोल्हापुरातून मुंबईत आले होते. त्यांना दारूचे व्यसन होते. शुक्रवारी महेश लोले आझाद मैदान किंवा आंदोलन स्थळी गेलेच नव्हते. त्यानंतर रात्री त्यांचा थेट मृतदेहच सापडलाय. कोल्हापुरातील महेश लोलेंच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली असून, ते कुटुंब मुंबईला येण्यासाठी रवाना झालेय. महेश लोले यांचा मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्यानं आता शवविच्छेदनानंतरच त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याचा उलघडा होणार आहे.


हेही वाचा : ST Strike- सदावर्तेंच्या इशाऱ्यावरूनच पवार यांच्या घरावर हल्ला- FIR मध्ये माहिती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -