घरCORONA UPDATELockdown : कामावर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर बॉसने मारला बुक्का

Lockdown : कामावर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर बॉसने मारला बुक्का

Subscribe

अनेक कंपन्या बंद असून आणीबाणीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या किंवा शक्य असल्यास घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जपानमधील लोकं ही कष्टकरी आणि मेहनती आहे. त्यामुळे जगभरामध्ये जापनिज लोकांकडे आदराने पाहिले जाते. जपानमधील ऑफिसचा कालावधी आणि तेथील कॉर्पोरेट कल्चरचीही बरीच चर्चा केली जाते. मात्र, सतत घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या देशाचाही वेग कोरोनामुळे मंदावला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणी घोषित केल्यानंतर देशातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. अनेक कंपन्या बंद असून आणीबाणीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याच्या किंवा शक्य असल्यास घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अशातही एक कर्मचारी कामाला आल्याने संतापलेल्या बॉसने त्याला मारहाण केल्याची घटना जपानमध्ये घडली आहे.

योमीउरी (Yomiuri) या स्थानिक वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, इमारतीचे बांधकाम करणारा एक २० वर्षीय कर्मचारी बंदी घालण्यात आलेली असतानाही मियागी प्रांतामधील शँडीन येथून हा कर्मचारी कंपनीच्या माध्यमातून बांधकाम सुरु असणाऱ्या यामागाटा प्रांतातील कामाच्या ठिकाणी पोहोचला. येथील व्यवस्थापकाने म्हणजेच या तरुणाच्या बॉसने आदल्या दिवशीच सर्व कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावे, कामावर येऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार या व्यवस्थापकाने हे निर्देश दिले होते. असं असतानाही हा कर्मचारी बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी पोहोचला. ४६ वर्षीय व्यवस्थापकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने या कर्मचाऱ्याला मारहाण केली. संतापलेल्या व्यवस्थापकाने या तरुणाच्या तोंडावर बुक्का मारुन त्याला जखमी केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या व्यवस्थापकाला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -