घरदेश-विदेशLive Update : मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला नाशिक येथून...

Live Update : मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला नाशिक येथून अटक

Subscribe

मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला नाशिक येथून अटक


हेमंत सोरेन ईडी कस्टडीमध्ये

- Advertisement -

हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

चंपई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री

- Advertisement -

भारतीय हद्दीतून मेंढपाळांना हुसकावण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न


अंधेरीच्या पर्ल रेसिडेन्सी इमारीच्या 12 व्या मजल्यावरील घराला आग

लेव्हल 1 ची आग घोषित करण्यात आली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


गुजरातच्या वडोदरा येथील फार्मा युनिटमध्ये गॅस गळतीनंतर भीषण स्फोट, तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून एक कामगार जखमी आहे.

वडोदरा जिल्ह्यातील पदरा तालुक्यातील एकलबारा गावात असलेल्या कारखान्यातील गॅस पाईपमधून गळती झाल्याने दुपारी दोनच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.


सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. नितीन पाटील (2007 बॅचचे अधिकारी) विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अभय महाजन (2007 बॅचचे अधिकारी) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संजय एल. यादव (2009 बॅचचे अधिकारी) सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई.
4. राहुल रेखावार (2011 बॅचचे अधिकारी) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
5. राजेंद्र क्षीरसागर (2011 बॅचचे अधिकारी) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा, मुंबई
6. अमोल येडगे (2014 बॅचचे अधिकारी) संचालक, मह राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
7. मनुज जिंदाल (2017 बॅचचे अधिकारी) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. भाग्यश्री विसपुते (2017 बॅचच्या अधिकारी) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशासक (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपट्टी संभाजी नगर
९. अवश्यंत पांडा (2017 बॅचचे अधिकारी) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. वैभव वाघमारे (2019 बॅचचे अधिकारी) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
11. संजीता महापात्रा (2020 बॅचच्या अधिकारी) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. मंदार पत्की (2020 बॅचचे अधिकारी) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
13. मकरंद देशमुख (2020 बॅचचे अधिकारी) सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. नतिशा माथूर (2020 बॅचच्या अधिकारी) संवर्ग गुजरातला महाराष्ट्रात बदलून प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.
15. मानसी (2021 बॅचच्या अधिकारी) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली.
16. पुलकित सिंग (2021 बॅचचे अधिकारी) सहाय्यक जिल्हाधिकारी, चांदवड उपविभाग, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, कळवण आणि सहायक जिल्हाधिकारी, कळवण उपविभाग, नाशिक
17. करिश्मा नायर (2021 बॅचच्या अधिकारी) सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभाग, बीड यांची प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, जव्हार आणि सहायक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


शहापुरात आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

10 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर, श्वास घेण्यासही त्रास

आश्रमशाळेत उत्तरकार्याच्या जेवणात पुलाव आणि गुलाबजामधून विद्यार्थ्यांना झाली विषबाधा


बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सन 2024-25 चा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारी 2024 ला होणार सादर

महानगरपालिका प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करतील.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची यादी युनेस्कोकडे सादर

शिवाजी महाराजांच्या एकूण 14 किल्ल्यांची नावं युनेस्कोकडे सादर

रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग या किल्लांची यादी युनेस्कोकडे सादर करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी संपली

शुक्रवारी 5 वाजेपर्यंत लेखी म्हणणं मांडता येणार


सूरत विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाण

केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी


किशोरी पेडणेकर यांना ईडीचे पुन्हा समन्स

पुढील आठवण्यात होणार किशोरी पेडणेकर यांची चौकशी


महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाची नोटीस

समन्वय समितीची कोणतीही बैठक न झाल्याने बजावली नोटीस


ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी

वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला निर्णय

हिंदू पक्षाने केली होती पूर्जा करण्याची मागणी


महाराष्ट्र इंटरमीडिएट ड्रॉईंग परीक्षेचा निकाल जाहीर

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य (महाराष्ट्र डायरेक्टोरेट ऑफ आर्ट्स) यांनी महाराष्ट्र इंटरमीडिएट ड्रॉईंग परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे

बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे

निवड झालेल्या 100 विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी https://dge.doamh.in/Public/Home.aspx या लिंकवर क्लिक करा


मराठ्यांना ओबीसीतून राजकीय आरक्षण मिळाल्यास तेही घेणार – मनोज जरांगे

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य


मानाचा शिव सन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला

येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राऊंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे


ईडीचं पथक मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी दाखल

चौकशीला होणार सुरू


राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक

पश्चिम बंगालमधील घटना


अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण


पुण्याहून दिल्लीकडे जाणारी तीन विमानं रद्द

दिल्लीतील बदलत्या वातावरणाचा परिणाम

वाढतं धुकं ठरतेय डोकेदुखी


राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू संसदेच्या लोकसभेत दाखल

मोदी सरकारचं शेवटचं अधिवेशन

आज राष्ट्रपती मुर्मू यांचं आज अभिभाषण


नाशिकमध्ये प्राप्ति कर विभागाचा छापा

प्राप्ति कर विभागाच्या पथकांनी बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर घातल्याची माहिती समोर येत आहे


आमदार रोहित पवार यांची उद्या पुन्हा ईडीची चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना बारामती अ‍ॅग्रो कंपनीप्रकरणात ईडीने बजावलेल्या नोटीस प्रकरणी

उद्या 1 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी पुन्हा हजर राहणार आहेत


मराठा आरक्षण बाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान

सागेसोयरे व गणगोत यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान

ओबीसी वेलफेयर फाऊंडेशन तर्फे Ad. मंगेश ससाणे यांची मुंबई उच्चं न्यायालयात याचिका

संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आटपाडीला जाणार

आमदार अनिल बाबर यांच्या पार्थीवाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आटपाडीला जाणार


मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द

आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळाची बैठक रद्द


राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

मराठा आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

मंत्री छगन भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष


शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळख


मुख्यमत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी

झारखंडच्या राजकारणात आजचा दिवस मोठा आहे

ईडीची टीम आज बुधवारी रांचीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार आहे

या चौकशीनंतर त्यांना अटक केली जाते की चौकशी करून सोडून दिले जाते हे पहावे लागणार आहे


दया नायक यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती

दया नायक यांच्यासह 23 पोलीस अधिकाऱ्यांना बढती


नागपूर जिल्ह्यातील 47 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील 47 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

काही दिवसातच लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

केंद्रीय अर्थसंकल्प आज मांडणार याकडे संपूर्ण देशवासीयांचं लक्ष

कोण-कोणत्या विषयांवर होणार चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -