घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरूच राहणार - पंतप्रधान

करोना व्हायरस : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरूच राहणार – पंतप्रधान

Subscribe

पंतप्रधानानी करोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमेत पक्षातील सर्व खासदारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

जगभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. करोनाच्या उद्रेकामुळे पंतप्रधानानी मंगळवारी संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज करोनाच्या भीतीपोटी लवकर गुंडाळले जाणार नाही, असे मोदींनी सांगितले आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अधिवेशन लवकर तहकूब करण्याची मागणी काही खासदारांनी केली होती. यावेळी खासदारांच्या मागणीकडे पंतप्रधानांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.

पंतप्रधानानी करोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती मोहिमेत पक्षातील सर्व खासदारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासही सांगण्यात आले आहे. याशिवाय विधानसभेतील अधिवेशन करोनाच्या भीतीमुळे लवकर उरकण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -