घरठाणेडायघर गाव नाक्यावर इमारत एका बाजूला झुकली; काही भागही कोसळला

डायघर गाव नाक्यावर इमारत एका बाजूला झुकली; काही भागही कोसळला

Subscribe

पहिल्या मजल्यावरती तीन व दुसऱ्या मजल्यावरती पाच अशी एकूण आठ कुटुंबे राहत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. व उर्वरित इमारत यापूर्वीच रिकामी केली असल्याचे दिवा प्रभाग समिती कडून सांगण्यात आले आहे

ठाणे: रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेली इमारत झुकण्याबरोबर त्या इमारतीचा एका बाजूचा काही भाग पडल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास डायघर गाव नाका येथे घडली. जयंता अपार्टमेंट असे झुकलेल्या आणि काही भाग पडणाऱ्या इमारतीचे नाव असून या इमारती वास्तव्यास असलेल्या आठ कुटुंबीयांसह १५ दुकानदारांना सुखरुळ बाहेर काढण्यात यश आले आहे.

तसेच त्या इमारतीच्या सभोवताली असलेली चाळी व घरे रिकामी करण्यात येऊन तेथील रहिवाशांना पडले गावातील ठामपा शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती तथापि त्या रहिवाशांनी शाळेत स्थलांतर होण्यास नकार देऊन जवळच राहत असलेल्या आपापल्या नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था स्वतःहून केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री बारा वाजण्यास दहा मिनिटे असताना, डायघर गाव नाक्यावरील जयंता अपार्टमेंट या तळ अधिक ५ मजली इमारतीचा एका बाजूचा काही भाग पडलेला तसेच उर्वरित इमारत एका बाजूला झुकलेली आहे. अशी माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यावर घटनास्थळी डायघर पोलीस , टोरंट विद्युत, आपत्ती व्यवस्थापन , दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती, बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, प्रभाग अधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने धाव घेतली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसलेली नाही. तसेच या इमारतीच्या तळमजल्यावरती एकूण १५ दुकान गाळे असून त्या सर्व गाळ्यातील व्यावसायिकांना डायघर पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर ती दुकाने पोलिसांच्या सहकार्याने बंद करण्यात आली आहेत. दुकान गाळे बंद असल्याने गाळे धारकांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच या इमारतीच्या पाच मजल्यावरती प्रत्येकी सहा रूम होते. त्यापैकी पहिल्या मजल्यावरती तीन व दुसऱ्या मजल्यावरती पाच अशी एकूण आठ कुटुंबे राहत असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. व उर्वरित इमारत यापूर्वीच रिकामी केली असल्याचे दिवा प्रभाग समिती कडून सांगण्यात आले आहे.

याशिवाय, सुरक्षेच्या कारणास्तव ती इमारत सद्यस्थितीला रिकामी करण्यात आलेली असून इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे व सभोवताली धोकापट्टी लावण्यात आली आहे. ही इमारतीच्या जागेचे मालक बाबुराव चांगा पाटील पहिल्या मजल्यावर दोन रूम आहेत. त्यांच्यासह वृषाली कृष्णा भोईर यांचा त्याच मजल्यावर एक रूम आहे. तर दुसऱ्या मजल्यावर नामदेव पाटील, माया पाटील, बाबुराव पाटील, सुनिता पाटील, बायमाबाई पाटील यांच्या मालकीचे प्रत्येकी एक एक रूम आहे.

- Advertisement -

तर इमारतीची दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यासह कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, प्रभाग अधिकारी यांनी पाहणी केली असता, कार्यकारी अभियंता यांनी सांगितले रात्रीची वेळ असल्याने अपुऱ्या प्रकाशामुळे या इमारती वरती कार्यवाही करणे धोकादायक असल्याने सकाळी इमारती वरती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ती कारवाई लवकरच सुरू होईल असा आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून सांगण्यात आले.

जयंता इमारत रस्ता रुंदीकरणातील बाधित इमारत

शीळ डायघर येथे रस्तारुंदीकरणाचे काम सुरू असून यामध्ये ही इमारत बाधित ठरली आहे. या इमारतीतील सर्व रहिवासी यांची यापूर्वीच दिवा रेंटल या इमारतीत राहण्याची व्यवस्था केलेली असून त्यापैकी काही नागरिक राहण्यास गेले आहेत. मात्र उर्वरित आठ कुटुंब आणि १५ गाळेधारक अद्यापही तेथे राहण्यास गेलेले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.


हेही वाचाः देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम आजपासून सुरू; जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याबाबतचे महत्त्वाचे नियम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -